नाशिक: तोळाभर सोन्याचा दर लाखावर पोहोचल्याने मध्यम व कनिष्ठ उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी थेट बाजारातून सोने खरेदी करणे जवळपास अशक्य बनले आहे. एकेकाळी लग्नसोहळे, सणवार आणि खास प्रसंगी सहज खरेदी होणारे दागिने आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मात्र अशा परिस्थितीत स्वप्न अजूनही जिवंत ठेवणारी सुवर्ण भिशी योजना त्यांना दिलासा देत आहे.