कोरोनाकाळात भाग्य चमकले पण प्रामाणिकपणाने अडविले!

इंदूबाईचे भाग्य चमकले पण त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाने अडविले.
gold chain return
gold chain returnesakal

सिन्नर (जि.नाशिक) : कोरोना काळात (corona virus) जिथे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येत असताना सिन्नरच्या पंचाळे गावात इंदूबाईचे भाग्य (destiny) चमकले पण त्यांना त्यांच्या (honesty)प्रामाणिकपणाने अडविले. काय घडले वाचा... (indubai returned golg chain)

पंचाळेच्या इंदूबाईंचे भाग्य चमकले पण....

रविवारी (ता. ९) सायंकाळी पंचाळे गावातील शिवाजी चौकात शिंदेवाडी येथील किरण हंडोरे कामानिमित्त आईला सोबत घेऊन आले होते. कारमधून खाली उतरताना त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत जमिनीवर पडली. हा प्रकार लक्षात न आल्याने ते दोघेही काम आटोपल्यावर कारमधून आपल्या गावाकडे निघून गेले होते. त्यानंतर काही वेळाने तेथून जाणाऱ्या इंदूबाई तळेकर यांना रस्त्यावर पडलेली पोत सापडली. त्यांनी आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांना याबद्दल विचारले. मात्र, कोणीही त्यासंदर्भात मालकी सांगितली नाही. त्यामुळे श्रीमती तळेकर यांनी जावई पत्रकार प्रभाकर बेलोटे यांना पोतीबद्दल सांगितले.

gold chain return
लॉकडाउनच्या घोषणेनंतर नाशिककरांची बाजारपेठेत तोबा गर्दी; पाहा VIDEO

आईच्या गळ्यातील पोत हीच...

बेलोटे यांनीदेखील परिसरात विचारणा केली असता, बाहेरगावाहून आलेल्या कोणाची तरी पोत पडली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोत सापडलेल्या ठिकाणी अर्ध्या तासापूर्वी हंडोरे यांची गाडी उभी होती व त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही त्या ठिकाणी आले नसल्याचे समजले. बेलोटे यांनी तत्काळ शिंदेवाडी येथे हंडोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सोबत आलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हरवली आहे काय, याबद्दल विचारणा केली. आईच्या गळ्यातील सोन्याची पोत सापडत नसल्याचे हंडोरे यांनी सांगितल्यावर त्यांना ओळख पटविण्यासाठी पंचाळे येथे बोलावण्यात आले. ते आल्यानंतर त्यांनी आईच्या गळ्यातील पोत हीच असल्याचे सांगितले. तळेकर यांनी प्रामाणिकपणा दाखवत पोत परत केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. नंदू बेलोटे यांच्यासह पंचांच्या उपस्थित संबंधित पोत हंडोरे यांच्याकडे सुपूर्द केली.

मूळ मालकाचा शोध घेऊन सुपूर्द

कारमधून उतरत असताना अनावधानाने महिलेच्या गळ्यातून तुटलेली वीस हजार रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत रस्त्यावर पडली. पोत सापडल्यावर ती मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचा प्रामाणिकपणा पंचाळे सोसायटीच्या व्हाइस चेअरमन इंदूबाई चांगदेव तळेकर यांनी दाखविला.

gold chain return
नाशिक महापालिकेला लसीचे ५ हजार ७०० डोस; ठराविक केंद्रांवरच मिळणार लस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com