नाशिक- साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. ग्राहकांची रेलचेल होती. शेअर बाजारातील पडझड, बँकांचे ठेवीवरील घटलेले व्याजदर यामुळे सोन्याचे दर लाखाच्या जवळपास पोचले तरीही सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. यंदा नाशिकच्या सराफी व्यवसायाला सोनेरी झळाळी आली. दरम्यान, रविवार असल्याने सोन्याचा सुमारे ९० हजारांचा प्रतितोळा दर स्थिर राहिल्याने याची संधी ग्राहकांनी साधली.