Governor Ramesh Bais: राज्यपालांच्या दौऱ्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त

पंचवटीतील काळाराम मंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप येणार आहे.
Governor Ramesh Bais
Governor Ramesh Baisesakal

नाशिक : राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी (ता.५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीसांकडून चोख पोलीस बंदाेबस्ताचे नियोजन करण्यात आलेे आहे.

विशेषत: पंचवटीतील काळाराम मंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप येणार आहे. राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती व पूजाविधी केली जाणार आहे. (Good police arrangements for Governor Ramesh Bais visit nashik news)

राज्यपाल रमेश बैस हे उद्या (ता.५) सकाळी ११ वाजता नाशिकला येत आहेत. मुंबई राजभवन येथून ते सकाळी हेलीकॉप्टरने नाशिक शहर पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर येतील.

येथून ते पंचवटीतील काळाराम मंदिरात आरती व पूजाविधीसाठी मोटारीने जातील. त्यानंतर ते मोटारीनेच त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाऊंडेशन येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत. राज्यपाल बैस यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

काळाराम मंदिर परिसरात पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सुमारे १५० जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय शीघ्रकृती दलासह राखीव तुकडीही सज्ज ठेवण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४५० पोलीसांचा बंदोबस्त शहरात तैनात असणार आहे.

Governor Ramesh Bais
Nashik Youth Festival : PM मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून हेलिपॅड अन सभास्थळाची पाहणी!

असा आहे बंदोबस्त

पोलीस उपायुक्त - १ (परिमंडळ एक)

सहायक पोलीस आयुक्त - ३

पोलीस निरीक्षक - ३

सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - २५

पोलीस कर्मचारी - ४५०

राखीव दलाची तुकडी -१

शीघ्रकृती दलाची तुकडी - १

Governor Ramesh Bais
Nashik Youth Festival : मोदी मैदानासह क्रीडासंकुलाची स्वच्छता; प्रत्येक राज्यातून 100 युवक-युवती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com