Gopichand Padalkar : केंद्राकडे नेण्याची गरजच नाही, धनगर आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या हातात

केंद्राकडे नेण्याची गरजच नाही, जळगावला समाजबांधवांचा मेळावा
MLA Gopichand Padalkar speaking at a gathering of Dhangar Samaj brothers here. dignitaries present on the dais.
MLA Gopichand Padalkar speaking at a gathering of Dhangar Samaj brothers here. dignitaries present on the dais.esakal

जळगाव (नि.) : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात समावेश करून त्यांना तसा दाखला मिळावा यासाठी मी शासनाशी भांडत आहे.

सरकार म्हणते की याबाबत अहवाल केंद्राकडे पाठवावा लागेल. अहवाल केंद्राकडे पाठवायची गरज नाही. राज्य सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न आहे असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. (Gopichand Padalkar statement Dhangar reservation issue in hands of state nashik)

येथे धनगर समाज जागरयात्रेनिमित्त आमदार पडळकर यांच्या उपस्थितीत समाज बांधवांचा मेळावा झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर समाजाचे नेते महेंद्र पाटील यांनी त्यांचे समाजाचे प्रतीक काठी आणि घोंगडी देऊन स्वागत केले. सभेच्या ठिकाणी पाच जेसीबीच्या साह्याने आमदार पडळकरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

श्री. पडळकर म्हणाले की मी समाज बांधवांच्या न्यायहक्कांसाठी शासनाशी भांडतोय. आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याची अंतिम सुनावणी सुरू आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निकाल अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील तेहेतीस आदिवासी जमातींना दाखले मिळालेले नाहीत. याउलट मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यांनी दाखले दिले, मग येथे का मिळत नाहीत. सरकारकडे तज्ज्ञ माणसे नसतील तर आम्ही ट्रॅव्हल भरून माणसे पाठवितो.

MLA Gopichand Padalkar speaking at a gathering of Dhangar Samaj brothers here. dignitaries present on the dais.
Dhangar Reserervation : आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण देणारच नाही, ते इतके... : डॉ. गावित

आम्हाला वकिलांची गरज नाही. समाजाने रडायचं नाही, लढायच. समाजाच्या ताकदीवर मी लढतोय, ठिकठिकाणी घोंगडी बैठका सुरू आहेत. ज्यांच्या कपाळावर भंडारा आहे तो आरक्षणास पात्र आहे.

अहिल्यादेवी, बिरोबा, खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. पहिल्या टप्प्यात वीस सभांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बिरोबाच्या आपेवाडीला दसरा मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे.

असून समाज बांधवांनी उपस्थित राहावे. मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मेळाव्याला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA Gopichand Padalkar speaking at a gathering of Dhangar Samaj brothers here. dignitaries present on the dais.
Nashik Onion Rate Hike: नामपूरला 28 हजार क्विंटल कांद्याची आवक! 2950 रुपये सर्वोच्च भाव; शेतकऱ्यांत समाधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com