esakal | पाच महिन्यांपासून वृद्ध ‘निराधार’! ऐन सणासुदीत उसनवारीची वेळ | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

Niradhar Yojana

पाच महिन्यांपासून वृद्ध ‘निराधार’! ऐन सणासुदीत उसनवारीची वेळ

sakal_logo
By
शरद भामरे

जुनी शेमळी (जि. नाशिक) : शासनाने चार ते पाच महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे खात्यावर जमा न केल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उधार- उसनवार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या तरी वृद्ध ‘निराधार’ आहेत.

बागलाण तालुक्यातील वृद्ध, निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनेतून दरमहा मदत दिली जाते. मात्र, चार ते पाच महिन्यांपासून त्यांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा न झाल्याने अनेकांवर उसनवारीची वेळ आली आहे. मुलांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने आधार देण्याची गरज आहे. तळागळातील नागरिकांचा विचार करून शासनाने सदर योजना राबवत असल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अनेक लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा अशा दारिद्र्यरेषेखालील अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले. सण-उत्सवाच्या काळात लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. अनेक लाभार्थी शासनाच्या मानधनावर अवलंबून असल्याने त्यांची दमछाक होत आहे. आधीच तुटपुंजे अनुदान अन्‌ तेही महिनोमहिने मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्‍न उभा आहे.

हेही वाचा: PHOTO : धबधबे अन् हिरव्यागार वनश्रीने नटला चणकापूर धरण परिसर!

हजार रुपयांच्या मानधनात घरातील किराणा खर्चही भागत नसल्याने मानधन दोन हजार रुपये करावे, अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. शासनाने कागदपत्रांसाठीची जाचक अट शिथिल करून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.

शासनाने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या योजनांचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्यांना अडचणी येत आहे. दैनंदिन गरजा आणि मिळणारे मानधन यांचा ताळमेळ बसत नाही. तरी शासनाने मानधनात वाढ करून दर महिन्याला मानधन द्यावे.
-अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी

हेही वाचा: गोड-मधाळ सिताफळांची ग्राहकांना भुरळ; आदिवासींना मिळतोय रोजगार

loading image
go to top