PHOTO : धबधबे अन् हिरव्यागार वनश्रीने नटला चणकापूर धरण परिसर!

Chankapur dam
Chankapur damesakal

कळवण (जि. नाशिक) : तालुक्यातील ब्रिटीशकालीन चणकापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने धरण क्षेत्रातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. नैसर्गिक सौंदर्य खुलल्याने हा परिसर पर्यटकांना खुणावत असून, काही दिवसांपासून याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

पर्यटकांना खुणावतेय धरण परिसराचे नैसर्गिक सौंदर्य
पर्यटकांना खुणावतेय धरण परिसराचे नैसर्गिक सौंदर्य esakal

पर्यटकांना खुणावतेय परिसराचे नैसर्गिक सौंदर्य

चणकापूर धरण परिसरात नैसर्गिक सुबत्ता, मोठ्या प्रमाणात वनराई असल्याने पर्यटकांचा वर्षभर येथे राबता असतो. विशेषतः कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव परिसरातील बहुसंख्य पर्यटक चणकापूर येथे पर्यटनासाठी येत असतात. येथून सप्तशृंगगड आणि गुजरात राज्यातील सापुतारा ही पर्यटनस्थळे जवळच असल्याने राज्यभरातील पर्यटक चणकापूर येथे भेट देत असतात. अतिवृष्टीमुळे धरण १०० टक्के भरले असून, विसर्ग सुरू असल्याने चणकापूर धरण परिसरातील आकर्षक धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याठिकाणी छायाचित्रणासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. निसर्गरम्य अन् शांतता असलेला परिसर, गर्द वनराई यामुळे पर्यटकांची चणकापूरला पसंती मिळत आहे. शनिवार, रविवार विकेंड पॉइंट म्हणून चणकापूरकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.

Chankapur dam
WhatsApp च्या 'व्हॉइस मेसेज'चा नवा फंडा
सापुतारा पर्यटनस्थळाच्या धर्तीवर पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा, बोटींग क्लब, निवासी व्यवस्था यासारखे उपक्रम सुरु झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगारासोबतच आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडू येथे शकतो.
सापुतारा पर्यटनस्थळाच्या धर्तीवर पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा, बोटींग क्लब, निवासी व्यवस्था यासारखे उपक्रम सुरु झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगारासोबतच आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडू येथे शकतो.esakal

पर्यटकांसाठी सुविधांची गरज

चणकापूर येथे पर्यटनास मोठा वाव असताना शासनाच्या पर्यटन विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असली तरी चणकापूर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होवू शकलेला नाही. शेजारील गुजरात राज्यातल्या सापुतारा पर्यटनस्थळाच्या धर्तीवर पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा, बोटींग क्लब, निवासी व्यवस्था यासारखे उपक्रम सुरु झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगारासोबतच आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडू शकतो.

Chankapur dam
दोन जावांनी एकत्र शेती करत साधली यशाची वाट; ३ एकरचे केले ८ एकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com