Chhagan Bhujbal
sakal
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपलब्ध जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द करण्यासाठी गतीने काम व्हावे, विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने यादृष्टीने समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.