Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्री नियुक्त करणार; शासनाकडून हालचाली

file photo
file photoesakal

Nashik Kumbh Mela : २०२६-२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने शिखर समितीची घोषणा करताना सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ, दादा भुसे व गिरीश महाजन यांना दुय्यम पदे ठेवली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे सूत्रे ठेवली.

आता त्यापलीकडे जाऊन उत्तर प्रदेशच्या धर्तीवर स्वतंत्र सिंहस्थ (कुंभमेळा) मंत्री पद निर्माण केले जाणार असून, त्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती करून भाजपकडून शिंदे गटावर कडी केली जाणार आहे. भुजबळ यांनी यापूर्वी भाजपच्या हिंदुत्वावर केलेल्या टीकेमुळे कुंभमेळा मंत्रिपद त्यांना दिल्यास भाजपची अ़डचण होवू शकते. (government will appoint an independent minister for Kumbh Mela nashik news)

कुंभमेळ्यासाठी शासनाने शिखर समितीसह साहाय्य ठरणाऱ्या समित्यांची घोषणा केली. शिखर समितीला साहाय्य करण्यासाठी चार समित्यांची स्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय शिखर समितीची स्थापना करण्यात आली आहे.

समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, रस्ते विकास महामंडळाचे मंत्री दादा भुसे या अकरा मंत्र्यांचा समावेश आहे.

शिखर समितीबरोबरच विविध प्रकारच्या चार समित्यांची घोषणा करण्यात आली. मुख्य सचिव अध्यक्ष असलेल्या १८ अधिकाऱ्यांची उच्चाधिकार समितीमध्ये मुख्य सचिव अध्यक्ष राहतील. त्याव्यतिरिक्त मंत्रालयातील सर्व विभागांचे प्रधान सचिव, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा समावेश समितीत असेल. शासनाने उच्चाधिकारी समितीमध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.

file photo
Nashik News: नंदिनी पाठोपाठ गोदावरी पूररेषा घटविण्याचा घाट; बिल्डर्स लॉबी सक्रिय

आराखड्याला शिखर समितीची मान्यता घेणे, छाननी करून शिफारस करणे, कामांना सुधारित मान्यता देणे, कामाचा आढावा या समितीमार्फत घेतला जाणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची जिल्हास्तरीय समिती राहील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ जणांची जिल्हास्तरीय कार्य समिती कार्यरत राहील.

खात्याऐवजी स्वतंत्र मंत्रिपद

सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन त्र्यंबकेश्वरसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तर नाशिक महापालिका हद्दीत महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियोजन केले जाते. २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रथमच कुंभमेळा मंत्रिपद स्वतंत्र खाते तयार करण्यात आले होते. परंतु स्वतंत्र मंत्रिपद दिले नव्हते. त्या वेळी गिरीश महाजन यांच्याकडे स्वतंत्र खाते होते. तेच नाशिकचे पालकमंत्रीदेखील होते.

२०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र मंत्रिपद निर्माण केले जाणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीमध्ये मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त सचिव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, नगरविकास विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयुक्त, दूरसंचार विभागाचे प्रतिनिधी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव-२ यांचा समावेश करण्यात आला आहे.

file photo
Nashik Politics: सिंहस्थ कुंभमेळ्याची सूत्रे शिंदे, फडणवीस, पवारांकडे; छगन भुजबळ, भुसेंना दुय्यम स्थान

शिंदे गटावर कुरघोडी

स्वतंत्र कुंभमेळा मंत्रिपद निर्माण करताना गिरीश महाजन यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेने जवळपास ११ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्र्यंबकेश्वरचा स्वतंत्र आराखडा राहील. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिपद दिले जाणार आहे. नाशिक महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे.

नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मेट्रो निओ घोषने व्यतिरिक्त अन्य काम झाले नाही. मेट्रोची घोषणादेखील अद्यापही कागदावरचं आहे. सिंहस्थात केंद्र सरकारचा नमामि गोदा प्रकल्पाचा समावेश राहणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या माध्यमातून ठोस असे काम दाखविण्यासाठी

नवीन मंत्रिपद निर्माण केले जाणार आहे. कुंभमेळ्याचा संबंध हिंदुत्वाशी असल्याने भाजपकडून ही संधी सोडली जाणार नाही. त्यामुळे महाजन यांच्याकडे कुंभमेळा मंत्रिपदाची सूत्रे राहतील. शिवसेनेच्या शिंदे गटाला संधी मिळू न देता कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे.

file photo
Nashik Kumbh Mela: साधूंनाही हवा कुंभमेळा समितीत प्रवेश; आखाडाप्रमुखांची जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com