esakal | मे महिन्यासाठी स्वस्त धान्य! दुकानातून प्रतिकार्ड धान्य वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

ration

मे महिन्यासाठी स्वस्त धान्य! दुकानातून प्रतिकार्ड धान्य वितरण

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना प्रादुर्भावाच्या (coronavirus) अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहायत्ता अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २००३ नुसार सवलतीच्या दराने मेसाठी (may month) स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य पुरवठा (grain supply) करण्यात आला आहे.

मे साठी स्वस्त धान्य!

सवलतीच्या दरात ध्यान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना मे २०२१ या एका महिन्यासाठी प्रतिकार्ड ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांना प्रतिव्यक्ती पाच किलो गहू, तांदूळ मोफत मिळणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंबपात्र लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य प्राप्त करून घेण्याचे आवाहन धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटाळे यांनी केले.

हेही वाचा: एकाही डॉक्टराने नाही तपासले; अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच सोडला प्राण

दुकानातून धान्य घेऊन जाण्याचे आवाहन

याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजना ३ अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम पात्र लाभार्थी यांना मे व जून २०२१ या कालावधीत प्रतिव्यक्ती गहु तीन किलो व दोन किलो तांदूळ असे एकूण पाच किलो याप्रमाणे व मे २०२१ साठी प्रतिकार्ड एक किलो हरभराडाळ मिळणार आहे. तरी सर्व पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांनी नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन जावे, असे आवाहन केले आहे. धान्य वितरणाबाबत काही तक्रारी असल्यास शासनाने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्यात यावी, असेही धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: मी ‘ईडी’ आयुक्त बोलतोय....‘ईडी’च्या नावाचा गैरफायदा घेत मागितली खंडणी!

loading image