Gram Panchayat Election : प्रतिष्ठेच्या लढतीत पिंपळगावला 72 टक्के मतदान!

Election
Electionesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.१८) किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदानासाठी नागरिकांनी उस्फूर्त गर्दी केली पण दुपार नंतर वेग मंदाविल्याने तुरळक रांगा दिसल्या. त्यामुळे गत वेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला. आत मतदान सुरू असताना राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते.

सरपंचपदाचे चे उमेदवार भास्करराव बनकर, गणेश बनकर, सतीश मोरे व आहेरराव यांच्यासह, तर सदस्यपदाच्या ५१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात आज बंद झाले. मंगळवारी दुपारी एक पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. (Gram Panchayat Election 72 percent voting in Pimpalgaon in battle of prestige Nashik News)

ग्रामपंचायतीच्या सत्तेसाठी दिव्य विकास पॅनलचे नेते भास्करराव बनकर व शहरविकास आघाडीचे नेते आमदार दिलीप बनकर व भाजपचे युवानेते सतीश मोरे यांच्या गटात 'कांटे की टक्कर' झाली. सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली. पहिल्या तीन तासांत साडेअकरापर्यंत २५ टक्के, तर दीडपर्यंत मतदानाचा आकडा ४० टक्क्यांपर्यंत पोचला. दुपारनंतर काहीशी गर्दी ओसरली. तीननंतर मतदान केंद्रे पुन्हा गजबजली व मताचा आकडा ५६ टक्क्यांपर्यंत पोचला. सायंकाळी गर्दी ओसरल्याने ७१.९१ टक्के मतदारांनी हक्क बजावला.

भास्करराव व दिलीप बनकर,सतीश मोरे या नेत्यांनी सकाळी प्रत्येक वॉर्डाला धावती भेट दिल्यानंतर सरकारी रूग्णालया समोरील प्राथमिक शाळेत तळ ठोकला. या ठिकाणी नेते, उमेदवार, मतदारांची गर्दी होती. आमदार बनकर हे वॉर्ड एक मध्ये मतदान केंद्रात सहा हजार मतदारांना डोळ्यासमोर ठेवून याच ठिकाणी थांबणे पसंत केले. परिवर्तन पॅनलचे नेते तानाजीराव बनकर, विश्वासराव मोरे, प्रगती पॅनलचे नेते दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे, माजी पंचायत समिती सदस्य राजेश पाटील,संघर्ष चे बापूसाहेब पाटील यांसह उमेदवारही केंद्रावर नजर ठेवून होते.

एकूण १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांना उमेदवार व समर्थक मतदान केंद्रापर्यंत घेऊन येत होते..सर्वच मतदान केंद्राबाहेर उमेदवार हात जोडून मतदाराला केंद्रात जाताना साकडे घालत होते. एकेक मताची किंमत मोठी असल्याने अपंग, वृद्धांनाही मतदानासाठी आणले जाते होते. परस्परविरोधी उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये कुरबुरी व बाचाबाची झाली. काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.

वॉर्ड तीनमध्ये सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले. तेथे दोन हजार ३७६ पैकी एक

हजार ००२ मतदारांनी मतदान केले. वॉर्ड एकमध्ये सहा हजार ४३९ पैकी चार हजार ४९३ (६९.७८) मतदारांनी, वॉर्ड दोनमध्ये पाच हजार ६ पैकी तीन हजार ५९७ (७१.८५), वॉर्ड चारमध्ये सहा हजार ९१८ पैकी चार हजार ९२१ (७१.१३), वॉर्ड पाचमध्ये पाच हजार ९७६ पैकी चार हजार ५२४ (७५.७०), वॉर्ड सहामध्ये पाच हजार ९४० पैकी चार हजार ४५(६८.१०) मतदारांनी हक्क बजावला.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Election
Gram panchayat Election : येवला तालुक्यात शेती कामातून वेळ काढत मतदार राजा मतदानासाठी केंद्रावर!

एकूण ३२ हजार ४५५ पैकी २३ हजार ४८२ (७१.९१ टक्के) मतदारांनी हक्क बजावला. गतवेळच्या तुलनेत एकूण तीन टक्के मतांची घसरण झाली.

चारमध्ये मतदान यंत्रात बदल

वॉर्ड चारमधील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही वेळ मतदान बंद होते. त्यानंतर प्रशासनाने अर्धा तासात नवे यंत्र बसविण्यात आले. सरपंचपदाच्या उमेदवार भास्करराव बनकर व सतीश मोरे यांनी वॉर्ड चार, तर गणेश बनकर यांनी वॉर्ड सहामध्ये मतदानाचा हक्क बजावला.

Election
Nashik Sports News : संतोष विद्यालयाचा फुटबॉल संघाची विभागीय स्तरावर बाजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com