Nashik Sports News
Nashik Sports Newsesakal

Nashik Sports News : संतोष विद्यालयाचा फुटबॉल संघाची विभागीय स्तरावर बाजी

येवला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिकद्वारा आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नाशिकच्या फ्रावशी शाळेला नमवीत बाभूळगाव (ता.येवला) येथील संतोष विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयातील फुटबॉल संघाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

Nashik Sports News
Sports Year Ender 2022 : आंदोलनांनी गाजवलं खेळाचं मैदान

नाशिक येथे पोलिस अकादमी येथे जिल्ह्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. जिल्ह्यातील एकूण नऊ महाविद्यालयाचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. साखळी सामन्यात बाजी मारत अंतिम सामना नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल नाशिक व बाभुळगावच्या संतोष श्रमिक कनिष्ट महाविद्यालय यांच्या मध्ये झाला. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला, त्यामध्ये संतोष श्रमिकच्या खेळाडूंनी फ्रावसी इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा दोन गोलने पराभव केला.ग्रामीण भागातील खेळाडूंनी कायम क्लब जॉईंट केलेल्या खेळाडूंचा देखील मोठ्या फरकाने पराभव केला.

सदर स्पर्धेसाठी पोलिस अकादमीचे प्रशिक्षक तुषार गवळी, हेमंत गरुड व सर्व प्रशिक्षक यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. मैदानी हर्डल्स अडथळा शर्यत स्पर्धेत देखील विद्यालयातील १४ वर्षे वयोगटातील ओम तनपुरे या खेळाडूने जिल्ह्यात चमकदार कामगिरी करत आपला विजयाचा झेंडा विभागीय स्पर्धेवर रोवला.

Nashik Sports News
Nashik Sports Update : नाशिकच्या मुलींची सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत धडक

यशस्वी सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सागर मुटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थापक अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, सचिव लक्ष्मण दराडे, कार्यकारी संचालक रूपेश दराडे, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सुनील पवार, प्राचार्य गोरख येवले, उपप्राचार्य अप्पासाहेब कदम आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

जिल्हास्तरावर झाली निवड

येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये महाविद्यालयातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजय मिळविल्याने जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रामुख्याने मैदानी स्पर्धेमध्ये शाळा-महाविद्यालयाच्या १४ ,१७ आणि १९ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तेजस माने ६०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

सांघिक क्रीडा प्रकारात ४-१०० रिलेमध्ये हर्षल हारपडे, तेजस माने, साहिल जेजुरकर, ओम शेळके, प्रशांत आहेर, ओम वाकचौरे या खेळाडूंनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगटांमध्ये देखील विनीत निर्भवणे १ हजार ५०० मीटर मीटरमध्ये प्रथम, वैभव पठारे तीन हजार मीटरमध्ये, अनिल निर्भवणे, अभिजित दाभाडे या खेळाडूंनी देखील प्रथम क्रमांक मिळवला.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

१९ वर्षे वयोगटात रोहित कदम २०० मीटर व ५०० मीटर धावणेमध्ये प्रथम, सचिन वैराळ,चेतन बोसारे यांनी १ हजार ५०० मीटरमध्ये प्रथम जितेंद्र भोई, भालाफेकमध्ये प्रथम रोहित कदम ५ हजार मीटरमध्ये प्रथम प्रथमेश कदम आला. सांघिक रेल्वे प्रकारांमध्ये देखील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये देखील कॉलेजच्या खेळाडूंनी तालुक्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत फुटबॉल या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत आपला विजय निश्चित केला. कुस्तीमध्ये विवेक राग या खेळाडूची चमकदार कामगिरी करत जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली तसेच बुद्धिबळ या स्पर्धेसाठी देखील गौरव गांगोडे, जयेश वाघ या दोन खेळाडूंची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी सर्व खेळाडूंचे आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, संचालक रूपेश दराडे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Nashik Sports News
Nashik Sports News : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत नाशिक उपविजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com