Grape
sakal
नाशिक
Agriculture News : संकटकाळात साथ कुठे? कष्ट शेतकऱ्याचे अन् मलिदा एजंट-निर्यातदारांचा; नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांमध्ये संतापाचे वातावरण
Major Weight Deduction Exposed in Nashik Grape Exports : नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक निर्यातदारांच्या अन्यायकारक 'घट' (कपात) प्रथेमुळे त्रस्त आहेत. क्विंटलमागे ७ किलो वजन कमी दाखवून निर्यातदारांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे उघड झाले आहे. शेतकरी वर्गातून आता या मनमानीवर निर्बंध घालण्याची तीव्र मागणी होत आहे.
नाशिक: निर्यातक्षम द्राक्षांची खरेदी करताना क्विंटलमागे सरासरी सात किलोची कपात करून जवळपास चार कोटींची कमाई संबंधित निर्यातदारांकडून झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘व्यथा द्राक्षपंढरीच्या’ या वृत्तमालिकेतून शेतकऱ्यांचे प्रश्न अधोरेखित होताच या विषयावर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वर्षानुवर्षे द्राक्ष उत्पादकांच्या मेहनतीवर उभे राहिलेले अनेक उद्योग संकटकाळात मात्र शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त होत आहे.
