द्राक्ष निर्यातीत वाढ अन्‌ युरोपात भावात घसरण

grapes
grapesesakal

नाशिक : देशातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची (grapes export) एक हजार १२२ कंटेनरमधून १४ हजार टनांहून अधिक निर्यात झाली. पण त्याचवेळी एप्रिलनंतर निर्यात कमी होऊन १५ मेच्या पुढे द्राक्षांच्या भावात वाढ होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात युरोपमधील सुपर मार्केटमध्ये पाच किलोच्या बॉक्सचा भाव १२ युरोवरून ८ युरोपर्यंत घसरला. गेल्या वर्षी कोरोना संसर्गातील लॉकडाउनचे (corona virus) फटके बसले असताना ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीची अनुभूती यंदा द्राक्ष निर्यातदारांनी घेतली. (Grape-exports-prices-fall-in-Europe-nashik-marathi-news)

द्राक्ष निर्यातीत वाढ अन्‌ युरोपात भावात घसरण

जागतिक बाजारपेठेत गेल्या वर्षी सहा हजार ८४२ कंटेनरमधून ९२ हजार ३४२ टन द्राक्षांची निर्यात देशातून झाली होती. यंदा सात हजार ९६४ कंटेनरमधून एक लाख सहा हजार ८०९ टन द्राक्षांची निर्यात झाली. मात्र, सुएझ कालव्यात २३ मार्चला अडकलेल्या जहाजामुळे निर्यात सुरळीत होण्यासाठी आठवड्याहून अधिक कालावधी लागला. त्यातच कंटेनरच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. इजिप्तमधून द्राक्षे मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून बाजारात येऊ लागली. ही द्राक्षे आठवडाभरात युरोपच्या सुपर मार्केटमध्ये पोचतात. त्यावेळी आपल्या द्राक्षाला सव्वा ते दीड महिन्यांचा कालावधी झालेला होता. मुळातच, युरोपच्या बाजारपेठेत आठवड्याला पाचशे कंटेनर खपत असताना ५५० ते ९०० कंटेनरभर द्राक्षे विक्रीसाठी पोचली होती. अशी सारी परिस्थिती द्राक्षांच्या भाव घसरणीमागे असल्याचे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले.

शेतापेक्षा कमी पैसे

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी बागेतून विकलेल्या भावापेक्षा कमी पैसे यंदा निर्यातीतून मिळाले आहेत. युरोपमध्ये द्राक्षांच्या पाच किलोच्या बॉक्सला ११, १२, १३ युरोपर्यंत भाव मिळाला होता. द्राक्षांची निर्यात वाढताच, भावात घसरण होण्यास सुरवात झाली. याच पार्श्‍वभूमीवर पाच किलोच्या बॉक्सला दहा युरोचा भाव मिळण्यासाठी सुपर मार्केटसाठी पाचशे कंटेनर आठवड्याला जातील, अशी व्यवस्था करणे अत्यावश्‍यक बनल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

grapes
शिवसेनेचे खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

यंदाच्या द्राक्षनिर्यातीची स्थिती (आकडे टनामध्ये)

नाशिक - ९६ हजार २८

सांगली - सहा हजार १२४

सातारा - दोन हजार १५४

लातूर - ८३३

नगर - ६४६

उस्मानाबाद - ४९०

पुणे - ३३३

सोलापूर - ६६

बीड - २४

grapes
वैद्यकीय परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना RT-PCR चाचणी सक्‍तीची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com