Grapes
sakal
नाशिक: नाशिकची द्राक्षे देशभरात नावाजलेली असली, तरी या पिकाच्या विक्रीदरम्यान शेतकऱ्यांना होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वर्षानुवर्षे वाढतच आहेत. यासाठी द्राक्ष खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची स्थानिक बाजारपेठेत अनिवार्य नोंदणी व्हावी, अशी शेतकरी वर्गाची मागणी यंदा पुन्हा जोमाने पुढे येत आहे. ‘नोंदणी बंधनकारक झाली तर शेतकरी फसवणुकीपासून वाचतील’, असे ठाम मत द्राक्ष उत्पादन क्षेत्रातून व्यक्त केले जाते.