Grapes
sakal
नाशिक: निर्यातक्षम द्राक्षांची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यावर वजन करण्यासाठी शेतकरी परंपरेने कोल्ड स्टोअरेजमधील काट्याचाच वापर करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत या वजनात मोठी तफावत आढळत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे कोल्ड स्टोअरेजमधील काटे अचूक आहेत का? वजन प्रक्रियेत कुठेतरी हेतुपुरस्सर फेरफार होतोय का? असा संशय शेतकऱ्यांत अधिकच तीव्र होत आहे.