Grapes
sakal
नाशिक: नाशिकची द्राक्षपंढरी... काही दिवसांपूर्वीपर्यंत हिरवाईने नटलेली, आशेने बहरलेली आणि कष्टांनी फुललेली. पण, यंदाच्या अवकाळी पावसाने या बागांचा चेहरामोहराच बदलून टाकला. नुकसानीचा जणू एक काळा ग्रह संपूर्ण द्राक्षपट्ट्यावर फिरला आणि हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरून गेला. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हाकेला हात देणारे अत्यंत कमी जण होते.