लासलगाव: खडक माळेगाव (ता. निफाड) धरण परिसरात सोमवारी (ता.१) सकाळी सव्वासातच्या सुमारास तब्बल शंभरच्या आसपास ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचा थवा आढळून आला. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच या दुर्मिळ विलोभनीय पक्ष्यांचे आगमन झाल्याने परिसरातील पक्षीप्रेमी व पर्यावरणप्रेमींत समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.