जुने नाशिक: धुळे ते नाशिक शहरातील अशोका रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. गणेशोत्सव निमित्ताने द्वारका भागात गणेश मूर्ती खरेदीसाठी झालेली गर्दी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. असे असतानाही रुग्णास नवे जीवन मिळावे. यासाठी कुठलाही विघ्न येऊन देता पोलिसांनी अतिशय समयसुचकता आणि सजगता दाखवत ग्रीन कॉरिडोर यशस्वी करून दाखवला.