आयुक्तसाहेब वाढत्या रुग्णसंख्येकडे लक्ष घाला - पालकमंत्री भुजबळ

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal

नाशिक : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोक वर काढले असून, रुग्णसंख्या हजाराच्या वर गेली आहे. सिन्नर, येवला, निफाड तालुक्यांत कोरोनाची रुग्णवाढ सुरू आहे. तसेच शहरात चिकूनगुनिया (Chikungunya), डेंगीचा (Dengue) प्रादुर्भाव वाढला आहे. सण-उत्सवाच्या तोंडावर कोरोना रोखण्यासाठी काळजी घ्‍यावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

आयुक्तसाहेब लक्ष घाला

श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यात हजाराच्या आत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा हजाराच्या वर सरकला आहे. निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यांत ही संख्या वाढली आहे. नगर जिल्ह्यातील प्रादुर्भावामुळे या तालुक्यांत संख्या वाढत आहे. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असली, तरी चिकूनगुनिया आणि डेंगीची रुग्णसंख्या मोठी आहे. सत्ताधारी भाजपला आंदोलने करावी लागत असतील, तर शहरातील स्थिती काळजी करणारी आहे.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी राज्यात नागपूर आणि नाशिक या दोन शहरांत डेंगी अन्‌ चिकूनगुनियाची रुग्णसंख्या वाढल्याचे सांगितले. त्यावर भुजबळ यांनी वाढत्या रुग्णसंख्येकडे लक्ष घाला, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले.

Chhagan Bhujbal
भुजबळ म्हणाले, 'आम्ही महाविकास आघाडीचे, आमचं आम्ही पाहून घेऊ'

पस्तीस रुग्णवाहिका घेणार

जिल्हाधिकारी सूरज मांढरे आजारी असून, जिल्हाधिकाऱ्यांना चिकूनगुनिया झाल्याने शहरातील वाढत्या साथरोगाविषयी श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्हाधिकाऱ्यांना चिकूनगुनिया नव्हे, तर पोस्ट कोविड असल्याची प्राथमिक माहिती आहे. डॉक्टर तपासणी करीत आहेत. दोन वर्षांपासून कोरोनाची साथ सुरू आहे. सातत्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. शहरातील डासांच्या उत्पत्ती केंद्रावर लक्ष द्यावे. १४ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेसाठी ३५ रुग्णवाहिका मंजूर झाल्या असून, कालबाह्य रुग्णवाहिका बदलून नव्या रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

Chhagan Bhujbal
डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांनी काय खावे? आहारतज्ञ सांगतात की..

- कोरोना संसर्ग दर : ३.६ टक्के
- कोरोना मृत्युदर : २.११ टक्के
- म्युकरमायकोसिस : २७ रुग्ण


आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, नरेंद्र दराडे, नितीन पवार, प्रा. देवयानी फरांदे, सरोज आहिरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आजारी असल्याने बैठकीला अनुपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com