Nashik News : थकीत शुल्‍क भरण्याचे पालकाला आदेश; फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीने दाखल केली होती याचिका

Fravashi Academy
Fravashi Academyesakal

नाशिक : शैक्षणिक शुल्‍कापोटी दिलेला धनादेश न वटविता, शुल्‍क थकविणाऱ्या पालकाविरोधात न्‍यायालयाने निकाल दिला आहे. यासंदर्भात फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीने न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.

थकीत शुल्‍क एक महिन्‍यात भरण्यासह संबंधित पालकाला एक महिन्‍याच्‍या सश्रम कारावासाची शिक्षा न्‍यायालयाने सुनावली आहे. (Guardian ordered to pay dues petition filed by Fravashi International Academy Nashik News)

फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये शिकत असलेल्‍या दोन पाल्‍यांचे शैक्षणिक शुल्‍क व प्रवासासाठी वापरलेल्‍या बससेवेचे शुल्‍क संबंधित पालकाने २०१८-१९मध्ये थकविले होते. या शुल्‍कापोटी तीन लाख ४७ हजार ३६० रुपये थकबाकी असताना, संबंधित पालकाने आपल्‍या पाल्‍यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा असल्‍याचे सांगत शाळा सोडल्‍याच्या दाखल्‍याची मागणी केली.

त्‍यानुसार थकीत शुल्‍कापोटी धनादेश शाळेत जमा केल्‍यानंतर शालेय प्रशासनाने दाखला दिला. मात्र, पालकाने दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. याबाबत विचारणा केल्‍यानंतर समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्‍याने शालेय प्रशासनाने १७ सप्‍टेंबर २०१९ला न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Fravashi Academy
Primary Teachers Transfer : सहाव्या फेरीतील बदलांना ग्रामविकास विभागाकडून स्थगिती

दरम्‍यानच्‍या काळात कोरोना महामारीमुळे न्‍यायालयीन कामकाज प्रभावित झालेले होते. तीन वर्षे ५ महिन्‍यांनंतर नुकताच न्‍यायालयाने निकाल दिला आहे. त्‍यानुसार पालकाला थकीत असलेली संपूर्ण रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आत शाळेला अदा करण्याचे आदेश दिले असून, एक महिन्‍याचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. थकीत शुल्‍क न भरल्यास सहा महिन्‍यांच्‍या कारावासाच्‍या शिक्षेचेही आदेश दिले न्यायालयाने दिले आहेत.

"शैक्षणिक संस्‍था व पालक यांच्‍यात सुसंवाद असणे आवश्‍यक आहे. पालकांना काही अडीअडचणी असतील तर शाळा, संस्‍थेला विश्‍वासात घेत समस्‍या सांगितल्‍यास यथोचित सहकार्य केले जाते. परंतु, केवळ शाळांची अडवणूक म्‍हणून शुल्‍क थकविणे अयोग्‍य आहे. सांमजस्‍य राखणे अत्‍यंत आवश्‍यक आहे."-रतन लथ, अध्यक्ष, फ्रावशी स्‍कुल्स

Fravashi Academy
Nashik News : ‘तबलिगी जमात’वर प्रतिबंध लावण्याची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com