Primary Teachers Transfer : सहाव्या फेरीतील बदलांना ग्रामविकास विभागाकडून स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A delegation of primary teachers visited the ministry

Primary Teachers Transfer : सहाव्या फेरीतील बदलांना ग्रामविकास विभागाकडून स्थगिती

लासलगाव : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या (Teacher) बदल्या संदर्भात सहाव्या फेरीतील बदलांना ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली.

दरम्यान, प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समितीच्या संघटनांनी या कामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला आहे. (Rural Development Department has suspended changes in sixth round regarding transfer of primary teachers in state nashik news)

या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने यातील सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून शिष्टमंडळाला मंगळवारी मुंबई येथे आमंत्रित केले.

मंगळवारी (ता.२८) शिक्षक संघ व शिक्षक समितीचे शिष्टमंडळ पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात चर्चा केल्यानंतर संबंधित विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा करून सहाव्या राउंड मधील बदल्या संदर्भात दुरुस्त्या करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार बदलांचे नवीन परिपत्रक संघटनेच्या शिष्टमंडळाला प्राप्त झाले. या मध्ये प्रामुख्याने सहाव्या राउंड मधील प्राथमिक शिक्षकांनी होकार अथवा नकार कळविला नव्हता त्यांना आता या नवीन परिपत्रकानुसार पुन्हा एक संधी देण्यात येणार आहे. पती -पत्नी विभक्तीकरण होत होते या नवीन आदेशानुसार यापुढे विभक्तीकरण होणार नाही.

पदवीधर शिक्षक मराठी विज्ञान गणित समाजशास्त्र हे पदवीधर आहे, परंतु यांना ती वेतनश्रेणी मिळत नाही, अशांची बदली झाल्याने ज्यांना वेतनश्रेणी आहे, त्यांचीच बदली आता होणार आहे. महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागात काम करण्यास प्रतिकूल शाळांमध्ये प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्तीने पदस्थापना देण्यात येऊ नये, असे ही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते अंबादास वाजे, शिक्षक समितीचे नेते काळुजी बोरसे, प्राथमिक शिक्षकसंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, समितीचे केदुजी देशमाने, शिक्षक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय शेवाळे, प्रदेश सरचिटणीस निंबा बोरसे, दिलीप वाघ, किरण गांगुर्डे, श्रीकांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी होते.

आता नवीन परिपत्रकानुसार ६ ते ८ मार्च या तीन दिवसात संवर्ग एक मधील शिक्षकांनी होकार अथवा नकार भरणे आवश्यक असून अर्जाची पडताळणी ९ ते ११ मार्च दरम्यान शिक्षणाधिकारी मार्फत करावी लागणार आहे.

बदली पीडितांना अखेर न्याय

प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग एक मधील बदली ज्या शिक्षकांचा बदली पोर्टलला नकार देणे राहून गेले होते, त्या बदली पीडितांना अखेर न्याय मिळाला असून संवर्ग एक मधील सर्वच शिक्षक अवघड बदली यादीतून वगळले जातील मात्र त्यांना आता बदली पोर्टलला वेळेत नकार द्यावा लागणार आहे. अवघड क्षेत्रातील सहाव्या राऊंडमध्ये ग्रामविकास विभागाने सुधारणा करून नवीन परिपत्रक ग्राम विकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे.