सप्तशृंगगडावर भाविकांविनाच गुरुपौर्णिमा उत्सव

Gurupournima
Gurupournima

वणी (जि.नाशिक) : गुरुपौर्णिमेनिमित्त दर वर्षी हजारो भाविकांच्या गर्दीने फुलणारा व आदिमायेच्या जयघोषाने निनादून जाणारा सप्तशृंगगड या वर्षी मात्र भाविकांविना सुना सुना होता. स्थानिक व परिसरातील भाविकांनी पहिल्या पायरीवरूनच आदिमायेच्या मंदिर कलशाचे व प्रतीकात्मक प्रतिमेचे दर्शन घेतले. (Gurupournima celebrated on Saptashringagada without devotees)


लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आदिमायेचे शक्तिपीठ सप्तशृंगगडावर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीसुद्धा बंद असल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक दर्शन घेऊ शकले नाहीत. दीड वर्षापासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ‘ब्रेक द चेन’ उपक्रमात सरकारने धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला मंदिर सुरू झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा संसंर्ग वाढल्याने सरकारने लॉकडॉउन घोषित केल्याने ५ एप्रिलपासून मंदिर पुन्हा बंद करण्यात आले आहे.

Gurupournima
संसाराचा सारीपाट मांडण्यापूर्वीच विस्कटला; कुटुंबियांवर शोककळा


दरम्यान, सकाळी साडेसातला न्यासाच्या कार्यालयापासून देवीची आभूषणे, सोन्याचा मुकुट, पादुकांची साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. आदिमायेची पंचामृत पुरोहितांच्या हस्ते महापूजा झाली. स्थानिक व परिसरातील भाविकांनी पहिल्या पायरीवरूनच कलशाचे दर्शन घेतले. गडावरील गुरुदेव आश्रमातही गुरुपौर्णिमा उत्सव झाला. वणी येथील जगदंबामाता मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भाविकांनी पूजन करीत दर्शन घेतले. मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषी मंदिर, पारेगाव येथील पाराशरी आश्रम, करंजी देवस्थान येथे भाविकांशिवाय धार्मिक विधी पार पडला.
(Gurupournima celebrated on Saptashringagada without devotees)

Gurupournima
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक शहरात १७५० ऑक्सिजन बेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com