Nashik Crime: वडाळा गावात 17 लाखांचा गुटखा जप्त

Crime
Crimeesakal

Nashik Crime : वडाळा गावात पोलिसांनी सुमारे १७ लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या मोठ्या कारवाईची संपूर्ण वडाळा परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. (Gutkha worth 17 lakhs seized in Wadala village Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime
Miraj Crime : शाळेत घेऊन जातो असं सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मित्राला 30 वर्षांची शिक्षा

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेहान अन्वर शेख (२८), शोएब इक्बाल पटेल (३३) महम्मद गुफरान कुतुबुद्दीन खान (२२) आणि असद झाकिर सय्यद (सर्व रा. वडाळा गाव यांनी १७ लाख १५ हजार ६२५ रुपये किमतीचा गुटखा साठा करून ठेवला होता.

सदर साठा सेंट सादिक शाळा परिसरातील सालार रो- हाउसेसच्या मागील परिसरात लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित झाकिर सय्यद याने गुटखा बंदी असताना चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने रेहान शेख याच्या मदतीने साठवून ठेवला होता.

मात्र, पोलिसांना खबर मिळताच कारवाईच्या भीतीने त्याने मुद्देमाल उघड्यावर फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. रात्री आठच्या सुमाराला वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फिल्मी स्टाइल धाड टाकत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या वेळी पळून जाण्याचा तयारीत असणाऱ्या रेहान, शोएब आणि गुफरान यांना अटक करण्यात आली आहे.

Crime
Jalgaon Crime News : वृद्धाला लोखंडी पाइपने मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com