जुने नाशिक: गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २६) दिवसभर घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांत तयारीचा धूमधडाका दिसून आला. घरोघरी सजावट करण्यासह सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी आरास उभारण्याच्या कामांना वेग आल्याचे दिसून आले. सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह संचारलेला दिसून आला. यातच शासकीय कार्यालयांमध्येही ‘श्रीं’च्या आगमनाची तयारी केली जात आहे.