esakal | अमरधाममध्ये मृतांच्या नातेवाइकांची छळवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

funeral

अमरधाममध्ये मृतांच्या नातेवाइकांची छळवणूक

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : कोरोनाची बाधा (coronavirus) होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे अमरधाममध्ये (amar dham) रोजच क्षमतेपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.

सरणासाठी लाकूड आणण्याची वेळ

अशा परिस्थितीत सरण रचण्यासाठी लागणाऱ्या लाकडाच्या ढिगाऱ्यापासून ते सरणापर्यंत लाकूड वाहण्यासाठी असलेला छोटा गाडा नादुरुस्त झाला. त्यामुळे सरणासाठी लाकूड आणण्याची वेळ नातेवाइकांवर आल्याचे प्रकार घडत होते. त्याची तक्रार भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांच्याकडे मृताच्या नातेवाइकाने केली असताना, पाटील यांनी जाब विचारताच लाकूड वाहण्यासाठी दोन नवीन गाडे त्वरित बाहेर काढण्यात आले. या प्रकारावरून मृतांच्या नातेवाइकांची येथे उगीच छळवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले.

हेही वाचा: ही दोस्ती तुटायची नाय! कोरोनाबाधित मित्राला बरे करूनच आणले घरी..

लाकूड आणण्यासाठी खास गाडा

पंचवटी अमरधाममध्ये सरण रचण्यासाठी लागणारे लाकूड आणण्यासाठी खास गाडा तयार केला आहे. त्यावर लाकूड ठेवून तो ढकलत अंत्यसंस्काराच्या बेडपर्यंत नेता येतो. हा हातगाडा तुटला असल्याने सरणासाठी लाकूड आणण्याचे काम मृतांच्या नातेवाइकांवरच सोपविण्यात येत असल्याचा प्रकार गणेश तांबे यांच्या लक्षात आला. नातेवाइकांना रिक्षातून सरणासाठी लाकडे आणण्याची वेळ येत असल्याची तक्रार गणेश तांबे यांनी भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांच्याकडे केली.

नगरसेवक जगदीश पाटील यांनी जाब विचारताच दोन नवीन गाडे

पाटील यांनी कोरोना काळात लोक अगोदरच हतबल झालेले आहेत, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झालेले आहे त्यांच्यावर अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशा कठीण परिस्थितीत त्यांना त्रास देण्याचा प्रकार केला जात आहे, हे योग्य नसल्याचे संबंधितांना कळविण्यात आल्यानंतर त्वरित अमरधाममध्ये दोन नवीन गाडे बाहेर काढले. भारतीय स्टेट बॅंकेच्या सौजन्याने हे गाडे दिलेले आहेत. हे गाडे तयार करण्यास किमान दोन दिवसांचा कालावधी लागला असता. हे गाडे गोडाउनमधून त्वरित बाहेर काढले म्हणजे ते अगोदरपासून येथे होते. हे गाडे असताना मृतांच्या नातेवाइकांना विनाकारण रिक्षातून लाकूड आणण्याची वेळ आणीत असल्याने या प्रकारावरून उघडकीस आल्याचे गणेश तांबे यांनी सांगितले.

हेही वाचा: हद्दीच्या वादात जळगाव-नाशिक सीमेवरील अमोदेफाटा चेकस्टपोट प्रश्न रेंगाळला?

loading image