esakal | "घरच्यांनी कोंडले म्हणून.. खिडकी तोडून बाहेर पडला.. अन् सुरू झाला ध्येयवेड्या तरुणाचा स्वप्नाचा प्रवास.
sakal

बोलून बातमी शोधा

army man.jpg

साल २०००, जळगावला सैन्याची भरती निघाली. भरतीच्या आदल्या दिवशीची रात्र. भरतीला जाऊ नये म्ह्णून त्याला घरात कोंडून घरचे बाहेर झोपले. गावातच एक लग्न असल्याने त्याची लगबग सुरू होती. पठ्ठ्याने घरात बॅगेत कपडे भरले आणि खिडकी तोडून बाहेर पडला आणि पूर्ण तयारीनिशी निडरपणे कुटुंबातील व्यक्तींना म्हणाला मला जायचं आहे. असे तो कळकळीने सांगत होता. 

"घरच्यांनी कोंडले म्हणून.. खिडकी तोडून बाहेर पडला.. अन् सुरू झाला ध्येयवेड्या तरुणाचा स्वप्नाचा प्रवास.

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे :सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी : असं म्हणतात एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून मिळवायची असते तेंव्हा पूर्ण जग तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी मदत करत असतं. 'बॉर्डर' चित्रपट पाहिल्यानंतर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ध्येयवेडा झालेल्या तरुणाची देशसेवेची अठरा वर्ष पूर्ण करीत मोठ्या अभिमानाने आपल्या जन्मभूमीत परतला आहे.

'बॉर्डर' चित्रपटाने त्याच्या स्वप्नाचा प्रवास सुरु

मावडी, ता. दिंडोरी येथे सामान्य कुटुंबात जन्मलेला संदीप आहेर हा मुलगा.. मित्रांसोबत मनसोक्त फिरणं, खेळणे, निसर्गाच्या सानिध्यात बोरं-चिंचा-आंबे खात रानोमाळ फिरणं असं आनंदात लहानपण गेलं. मावडीच्या मराठी शाळेत शिक्षणाची सुरुवात करून नंतर १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. एकदा टीव्हीवर बघितलेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाने त्याच्या स्वप्नाचा प्रवास सुरु झाला. कोणतं स्वप्न होतं पैसे कमावणे ? बंगला उभं करणं ? आलिशान गाडी घेणं ? अजिबात नाही..तर सैन्यात जाऊन देशाचं संरक्षण करणं. हे स्वप्न संदीपच्या हृदयात पेरलं गेलं. मावडीतच व्यायामाला, धावायला सुरुवात केली.. जिथं जीवाला क्षणोक्षणी धोका आहे, तिथं कोणते आई- वडील पोटच्या गोळ्याला पाठवतील. घरच्यांचा स्पष्ट नकार. पण देशसेवेचं स्वप्न संदीपला शांत बसू देईना...

असा सुरू झाला त्याचा प्रवास..

साल २०००, जळगावला सैन्याची भरती निघाली. भरतीच्या आदल्या दिवशीची रात्र. भरतीला जाऊ नये म्ह्णून त्याला घरात कोंडून घरचे बाहेर झोपले. गावातच एक लग्न असल्याने त्याची लगबग सुरू होती. पठ्ठ्याने घरात बॅगेत कपडे भरले आणि खिडकी तोडून बाहेर पडला आणि पूर्ण तयारीनिशी निडरपणे कुटुंबातील व्यक्तींना म्हणाला मला जायचं आहे. त्याची कळकळ बघून घरचेही इच्छा नसताना तयार झाले. गवळी अण्णांच्या इथं असलेल्या बेंजो पथकातील एका वाजंत्री मित्राने त्याला रात्री खेडेगाव येथे सोडलं व तेथून मित्रासोबत थेट जळगाव गाठलं.

आपल्याच मातीत रुतून पुन्हा आपला आधार घट्ट करणं..

असं म्हणतात एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून मिळवायची असते तेंव्हा पूर्ण जग तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी मदत करत असतं. आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनत यावर संदीपची सैन्यदलाची निवड झाली, अनं संदीपच्या आनंदाला पारावार राहीली नाही.. मग साधारणतः वर्षाच्या ट्रेनिंगसाठी तो तिथूनच नाशिक येथे रवाना झाला. नंतर सैन्यात त्याची पोस्टिंग उत्तर-पूर्व भारतातील आसाम या राज्यात झाली. तिथं तीन वर्षे सेवा बजावल्यानंतर जम्मु काश्मीर मधील कारगील, उरी,गुलमर्ग व पंजाब,राजस्थान येथे त्यांनी उरलेली १४ वर्षे देशसेवा बजावली..या सेवेत त्याला अनेक बढत्या भेटल्या तरी त्याचं वागणं वटवृक्षासारखं राहिलं.. कितीही उंच गेला तर पुन्हा पारंब्याच्या रुपात आपल्याच मातीत रुतून पुन्हा आपला आधार घट्ट करणं..
या सेवेत तो खूप शिकला. सैन्याचे नियम, शिस्त व देशसेवा या गोष्टींनी त्याला प्रगल्भ बनवलं. तरीही सुट्टीला गावाला येऊन कुटुंब, मित्र यांच्यासमवेत त्याने आनंदाचे क्षण वाटले.

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

मावडीकरांची स्वागताची जय्यत तयारी
कालच्या ३१ तारखेला आपली अठरा वर्षाची भारतमातेची सेवा करून हा उमदा तरुण जम्मू वरून पुन्हा आपल्या मातीला भेटायला येतोय. मावडी येथील साई स्टील वर्क्स अँड हार्डवेअर  सचिन अहिरे यांचे छोटे बंधु असलेल्या संदिप अहिरे या बार्डवरवरील हिरोची स्वागताची जय्यत तयारी मावडीकर करीत आहेत.

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'

loading image