esakal | घाटनदेवी नाक्यावर तपासणी ‘रामभरोसे‘!गुरुजनांनी धरला घरचा रस्ता

बोलून बातमी शोधा

ghatan devi naka
घाटनदेवी नाक्यावर तपासणी ‘रामभरोसे‘!गुरुजनांनी धरला घरचा रस्ता
sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील घाटनदेवी परिसरातील तपासणी नाक्यावर पोलिस अन गृहरक्षक दलाचे जवान वाहनांची तपासणी करताहेत खरे. पण जिल्हा बंदीचे वाजलेत तीन-तेरा हे वृत्त आज ‘सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच, नाक्यावर सेवेची जबाबदारी असलेल्या गुरुजनांनी ‘सेल्फी’ घेत आपण कर्तव्य कसे बजावत असल्याचे वरिष्ठांना कळवत घरचा रस्ता धरला. या धगधगत्या वास्तवाला तपासणीसाठी असलेल्या पोलिसांनी तोंड फोडले.

घाटनदेवी तपासणी नाक्यावर आरोग्य तपासणी ‘रामभरोसे‘

गुरुजनांची ही झाली एकीकडे तऱ्हा. दुसरीकडे तपासणी नाका सुरू झाल्यापासून आरोग्य विभागाने अघोषित तपासणीला हारताळ फासला आहे. आरोग्याची तपासणी होत नसल्याने कोरोनाचा बिनबोभाट जिल्ह्यात शिरकाव होण्याचे सत्र आज दुसऱ्या दिवशीही थांबायला तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. इथे पोलिसांचे चोवीस तास पथक कार्यरत आहे. या पोलिसांसाठी इथे कोणत्याही प्रकारची सुविधा दिसून आली नाही. एक तंबू उभारण्यात आला आहे. त्यात दोघे बसू शकतात. त्यामुळे इतरांना उन्हाच्या चटक्यात ताटकळ उभे राहावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून आले.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

घाटनदेवी परिसरातील तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी. तसे घडत नसल्याने बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीची आरोग्य तपासणी होत नाही. परिणामी, कोरोना संसर्गाचा फैलाव रोखणार कसा? असा प्रश्‍न अनुत्तरित राहतो. - सचिन गायकवाड, इगतपुरी