साक्री- आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत वारंवार वरिष्ठ स्तरावर काही निवडक व्यक्ती निवेदने व तक्रारी करून नाहक बदनामी करीत आहेत. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, हे प्रकार थांबविण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले.