सुदृढ, निकोप राजकारणाची चर्चा गरजेची : आमदार डॉ. सुधीर तांबे

MLA Dr. Sudhir Tambe
MLA Dr. Sudhir Tambeesakal

पंचवटी : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पंचाहत्तर वर्षानंतरही आपण निकोप, सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करू शकलो नाही. आज समाजातील नैतिकतेची घसरण सुरूच आहे. चांगल्या समाज निर्मितीसाठी (कै.) ॲड. उत्तमराव ढिकले यांच्यासारख्या निरपेक्ष, समर्पित वृत्तीने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

ॲड. उत्तमराव ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून दरवर्षी वाचनालयाचे संस्थापक (कै.) उत्तमराव ढिकले यांच्या स्मरणार्थ व वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘पंचवटी भूषण’, ‘पंचवटी गौरव’ व ‘आदर्श ग्रंथपाल’ पुरस्कार पंचवटीतील कर्तबगार व्यक्तींना दिला जातो. मागील दोन वर्षापासून कोविड काळात हा सोहळा घेता आला नव्हता. म्हणून या वर्षी तीन पंचवटी भूषण, सहा पंचवटी गौरव, दोन कोविड योद्धा पंचवटी गौरव, एक आदर्श ग्रंथपाल पुरस्कार अशा बारा कर्तबगार व्यक्तींना गुरुवारी (ता. ७) डॉ. तांबे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

MLA Dr. Sudhir Tambe
नाशिक : मनपा अर्थकारणाचा प्रमुख स्रोत कमकुवत

सोहळा विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. परंतु, श्री. झिरवाळ दिल्लीहून वेळेवर पोचू न शकल्याने डॉ. तांबे यांच्या हस्ते तो पार पडला. व्यासपीठावर वाचनालयाचे व समारंभाचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी देवरे, ज्येष्ठ नगरसेवक गुरमित बग्गा आदी उपस्थित होते. या वेळी मधुकर जेजुरकर, डॉ. अरुण गुंजाळ, रावसाहेब मोरे या तिघांना पंचवटी भूषण, तर कु. ओवी व्यवहारे, कु. पुनम तांबे, पवन खोडे, सचिन भोसले, गजानन माधव देवचके, डॉ. मिथिला चव्हाण या सहा जणांना पंचवटी गौरव, चंद्रकला विठ्ठल शिरसाट, योगेश विजयराव खैरनार या दोघांना कोविडयोद्धा पंचवटी गौरवने सन्मानित करण्यात आले.

MLA Dr. Sudhir Tambe
निधी खर्चांत तांत्रिक अडणींमुळे नाशिकचा ‘शेवटून पहिला’ क्रमांक

याशिवाय प्रा. संभाजी ह्याळीज यांना (कै.) ल. स. वैद्य आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रा. डॉ. शांताराम रायते, हिरालाल परदेशी, उल्हास धनवटे, सुभाष पाटील, धनंजय धनवटे, मंदार जानोरकर, सुहास खालकर, संजय नेरकर, ग्रंथपाल योगिता भामरे, निकेतन शिंदे यांच्यासह पंचवटीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नथुजी देवरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुनील ढिकले यांनी दिला. डॉ. अरुण गुंजाळ यांनी सत्काराला प्रातनिधिक उत्तर दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com