Nashik News : माजी सदस्यांचा ‘पुन्हा येणार’ चा नारा; पिंपळगावला गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले

gram panchayat election
gram panchayat electionesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ग्रामपंचायतीची मुदत संपलेल्या गावांमध्ये राजकीय वातावरणामुळे गुलाबी थंडीत चांगलेच वातावरण तापले आहे. बनकर व मोरे घराण्यातील राजकीय संघर्षामुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या लढाईकडे नाशिक जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या धामधूममध्ये अनेक गावातील माजी सरपंच, सदस्य याही निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ चा नारा देताना दिसत आहे. (heated atmosphere at gram panchayat election in Pimpalgaon Nashik News)

निफाड तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २२९ सदस्यांसाठी एक हजार १२ अर्ज दाखल झाले आहेत. तर २० सरपंचपदासाठी १४५ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्याने निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकाळ संपलेले सरपंच व सदस्य या निवडणुकीसाठी पुन्हा रिंगणात उतरत आहेत.

अनेक गावांमध्ये आरक्षण सोडतीचे काही उत्सुक असलेल्या उमेदवारांची कोंडी झाली आहे. मात्र, ज्या ठिकाणी जुन्या सरपंच व सदस्यांना उभे राहण्याची संधी आहे, अशा ठिकाणी मात्र, माजी उमेदवार संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात आहेत. तथापि, उमेदवार यांच्याकडून मी पुन्हा येईल असा नारा दिला जात असला तरी याला किती प्रतिसाद मतदार देता की की सत्ता बदल करतात हे निकाल मधूनच पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

gram panchayat election
Nashik Crime News : अनैसर्गिककृत्य केल्याचे सांगू नये म्हणून अपहृत बालकाचा निर्घृण खून!

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास गावाला अधिकचा निधी

गावात कोणतीही निवडणूक म्हटली की, समोर येते गटबाजी, जातीपातीचे राजकारण. गावात झालेल्या निवडणुकीचे पडसाद हे गावांमध्ये अनेक वर्षे दिसत असतात. या गटबाजीमुळे गाव विकासाला खीळ बसते. गावात असलेले खेळीमेळीचे वातावरण तणावपूर्ण होते. गाव विकासात आवश्‍यक असलेली कामे ही समर्थन व विरोधात मागे पडतात आणि अनपेक्षीपणे गाव विकासापासून दूर राहते.

यासाठी गावागावांमध्ये सर्वसमावेशक सामोपचाराने बिनविरोध निवडणूक घेतल्यास गावाची एकता कायम ठेवता येईल. सर्वांना सोबत घेऊन विकास साधता येईल. यासाठी संघर्ष टाळून बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना अधिकचा निधी देण्याचा मानस आमदार दिलीप बनकर यांनी व्यक्त केला.

gram panchayat election
SAKAL Exclusive : क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता Online होणार!

उपसरपंचपदासाठी फिल्डींग

निवडणुकीत सरपंच पद हे थेट जनतेतून निवडल्या जाणार असल्याने उर्वरित सदस्यांना एकत्र करण्यासाठी उपसरपंच पदासाठी रस्सीखेच होताना दिसत आहे. सरपंच थेट मतदानातून होत
असल्याने दुय्यम समजल्या जाणाऱ्या उपसरपंचपदालाही महत्त्व आले आहे. त्यामुळे आपले समर्थकांचे अधिक अर्ज भरून ते निवडून आणण्यासाठी आतापासून फिल्डींग लावली गेली आहे.

सरपंच व सदस्यांसाठी दाखल झालेले अर्ज

पिंपळगाव बसवंत (१२/१२३), दिक्षी (८/५२), खडक माळेगाव (६/९८), नांदुडी (८/४५), निमगाव वाकडा (८/४४), कोटमगाव ( ७/३३), थेटाळे (६/१४), लोणवाडी (३/२५), तारूखेडले (७/३२), बोकडदरे (७/३६), कसबे सुकेणे (१८/१०१), खानगाव थडी(७/३०), कोकणगाव (३/३८), मांजरगाव (१०/२९), पिंपळस (४/७५), साकोरे मिग (४/३९), शिंगवे (५/४७), सोनेवाडी खु.(३/१४), धारणगाव वीर (६/३२), चांदोरी(१३/१०५).

gram panchayat election
Nashik News : तुकाराम ठोक यांना वयाच्या 68 व्या वर्षी PhD; कोरोनाशी लढत असताना देखील केला अभ्यास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com