crop damage
sakal
नाशिक: परतीच्या पावसाने नाशिक विभागाला तडाखा दिला आहे. काही गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतीपिकांना बसला आहे. विभागात तीन लाख २९ हजार आठ हेक्टरवरील पिकांचा चिखल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिवापाड जपलेली पिके क्षणार्धात मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत.