esakal | इगतपुरीतील भातशेतीला यंदा ग्रहण; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rain damage paddy farming

इगतपुरीतील भातशेतीला यंदा ग्रहण; सततच्या पावसाने मोठे नुकसान

sakal_logo
By
गोपाल शिंदे

घोटी (जि. नाशिक) : तालुक्यात सलग दहा दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात हाहाकार माजवला आहे. या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून यंदा उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे गणितही कोलमडणार आहे. या पावसाने सर्वच जण हैराण झाले आहेत. वर्षातील मुख्य पीक आणि त्यावर वर्षभरातील कर्ज, इतरांची आर्थिक देवाणघेवाण अवलंबून असते, अशा भाताचीच यंदा वाट लागली आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आदिवासी तालुक्यात पर्जन्यमान अधिक असल्याने भाताची लागवड सर्वाधिक होते. भात काढणीला पावसाने विश्रांती देणे गरजेचे असताना आठ दहा दिवसांपासून धिंगाणा घालणाऱ्या या पावसाने गतवर्षासारखी घट येण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील पूर्व मध्य व पश्चिम भागात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे भाताचे नुकसान होत आहे. भातशेती वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. उशिरा लावणी झालेल्या भात पिकांना सद्याच्या वातावरणात फुलोरा फुलण्याचा हंगामात पावसामुळे उत्पादनात घट येणार आहे.

हेही वाचा: केवळ मोदींची खुर्ची लिलावात काढणे बाकी - मेधा पाटकर

अनुदान दुप्पट करण्यात यावे

भात क्षेत्रावर रोगराईने हैराण केले आहे. काढणीस आलेल्या पिकांत पाणी साठल्याने भात कापणी दरम्यान तारांबळ उडत आहे. यातच पाण्यात भिजलेल्या वाणांची कापणी करताना मजुरांना दुप्पटीने रोज द्यावा लागतो. खते, बियाणे यांसह मजुरी, रोगराईने हैराण शेतकरी आता किंटलला गतवर्षी दिलेले सातशे रुपये अनुदान दुप्पट करावे अशी मागणी करीत आहे.

हेही वाचा: Photo: नाशिक जिल्ह्यात बंदला प्रतिसाद, शेतकरी संघटनेचा विरोध

loading image
go to top