Nashik Rain News : घाट विभागात आज जोरदार अन उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Nashik Rain News
Nashik Rain News esakal

Nashik Rain News : मॉन्सूनच्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा असलेल्या नाशिकमध्ये मंगळवारी (ता. २५) सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत ५.७ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळपासून संततधार पाऊस झाल्याने साडेआठपासून सायंकाळी पाचपर्यंत ८.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

या पावसामुळे खड्डेमय रस्त्यांवर शहराच्या विविध भागांत तळे साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच, २४ तासांत सुरगाणा तालुक्यात २४.४, इगतपुरीत २६.५, पेठमध्ये ३३.४, तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये २४.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे बुधवारी (ता. २६) जिल्ह्यातील घाट विभागात काही ठिकाणी जोरदार, तर गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Heavy rain forecast in Ghat section today and tomorrow with thunder in nashik news)

३० जुलैपर्यंत हवामान ढगाळ राहणार असून, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शिवाय, तापमान कमाल २६ ते ३०, तर किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला २१ ते २८ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेता कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी थांबविण्यासह भाताच्या रोपांची पुनर्लागवड ३१ जुलैपर्यंत करण्याचा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

शिवाय, भाताची चार आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीच्या रोपांची पुनर्लागवड करण्यात येऊ नये, अन्यथा उत्पादनात घट येईल, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार पश्चिम घाट विभागातील इगतपुरी व पेठ तालुक्यांत ४० टक्के भात पुनर्लागवड झाली आहे. दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत ४ ते १० टक्के भात रोपांची पुनर्लागवड झालेली आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

तालुकानिहाय आज सकाळी संपलेल्या २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये आणि आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षी २५ जुलैला झालेल्या तालुक्यातील पावसाची टक्केवारी दर्शविते) : मालेगाव- १.१- ८३.७ (१७४.५), बागलाण- १.२- ७०.८ (१८७.८), कळवण- ३.९- ८६.३ (२४४.८), नांदगाव- ०.५- ५८.१ (१४२.३), सुरगाणा- २४.४- ८२.८ (१८८.७), नाशिक- ६.३- ५२.४ (१६०.८), दिंडोरी- ११.२- १११.५ (३१३.५), इगतपुरी- २६.५- ५७.१ (७६.३), पेठ- ३३.४- ७९.९ (२२१.१), निफाड- ३.१- ७६.४ (१९७.५), सिन्नर- १.६- ५०.६ (१३२.५), येवला- १.८- ७३.७ (१२८.३), चांदवड- ३- ५०.१ (२१४.५), त्र्यंबकेश्‍वर- २४.३- ६०.८ (१३१.४), देवळा- ३-७२ (२०६.९).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Rain News
Nashik Rain Update: भावली धरण शंभर टक्के भरले! यंदाही मारली प्रथम बाजी

जिल्ह्यात आतापर्यंत ६३.५ टक्के पाऊस झाला असून, याच कालावधीत जिल्ह्यात गेल्या वर्षी १५२.३ टक्के पाऊस झाला होता. तसेच, गेल्या २४ तासांत मंडलनिहाय झालेला चांगला पाऊस मिलिमीटरमध्ये याप्रमाणे : उंबरठाण- ३४.५, बाऱ्हे- २५.८, मनखेड- १८.८, सुरगाणा- ३४.५, पेठ-३८, जोगमोडी- २४.३, कोहोर- ३८, ननाशी- ३५.३, कोशिंबे- १६.३, कसबेवणी- १३.८, इगतपुरी- ३९.३, घोटी- १९, वाडीवऱ्हे- २१.८, टाकेद व नांदगाव सदो- प्रत्येकी १८, धारगाव- ४३, त्र्यंबकेश्‍वर- २८, वेळुंजे- २६, हरसूल- १९.

गेल्या वर्षी नऊ अन आता भावली धरण ‘फुल्ल’

जिल्ह्यातील सात मोठ्या आणि १७ मध्यम अशा एकूण २४ धरणांपैकी आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे गेल्या वर्षी २५ ऑगस्टपर्यंत १०० टक्के भरली होती. यंदा आतापर्यंत आळंदीमध्ये १७, वाघाडमध्ये २७, ओझरखेडमध्ये २६, तिसगावमध्ये ०, वालदेवीमध्ये २८, भोजापूरमध्ये ११, हरणबारीत ६८, केळझरमध्ये ५१ टक्के जलसाठा झाला आहे.

नुकतेच भावली धरण पूर्णपणे भरले. नांदूरमधमेश्‍वर धरणात ५९ टक्के साठा ठेवून त्यातून एक हजार २५०, तर ७८ टक्के भरलेल्या दारणा धरणातून एक हजार १०० क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिककरांचे पिण्याचे पाणी अवलंबून असलेल्या गंगापूरमध्ये ५५ टक्के आणि मालेगावसह खानदेशच्यादृष्टीने महत्त्वाच्या ‘गिरणा’मध्ये २३ टक्के साठा झाला आहे.

इतर धरणांमधील जलसाठ्याची टक्केवारी अशी : कश्‍यपी- ३०, गौतमी गोदावरी- २९, पालखेड-४१, करंजवण- ३१, पुणेगाव- ३०, मुकणे- ५६, कडवा- ४३, चणकापूर- ४१, पुनंद- ५०. जिल्ह्यातील धरणांमध्ये ४१ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणे ८३ टक्के भरलेली होती.

Nashik Rain News
Nashik Rain Update: नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले! महिन्याभरात गंगापूर धरणात 1 TMC साठा वाढला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com