नाशिक : वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain Affected house

नाशिक : वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

खामखेडा (जि. नाशिक) : देवळा तालुक्यातील खामखेडा गावासह परिसरात बुधवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पावसाने (Heavy rainfall) अर्ध्या तासातच नागरिकांची दैना केली. (Heavy rain in Khamkheda area Nashiik News)

वादळी वाऱ्यामुळे खामखेडा-सावकी रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. शेतकरी प्रभाकर यादव शेवाळे यांच्या शेतातील पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शेडमध्ये बांधलेली म्हैस किरकोळ जखमी झाली. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक आटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. कांदापीक झाकण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.