जिल्ह्यात पावसाची द्विशतकी अन दिंडोरीत त्रिशतकी ‘बॅटींग'

Heavy Rain latest marathi news
Heavy Rain latest marathi newsesakal

नाशिक : पावसाची (Rain) विश्रांती...अधूनमधून संततधार...ढगाळ हवामान कायम अशी आज दिवसभरातील स्थिती राहिली. जिल्ह्यात आतापर्यंत १६४.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

बागलाण, कळवण, सुरगाणा, पेठ, निफाड, चांदवड, देवळा या तालुक्यात पावसाची द्विशतकी, तर दिंडोरी तालुक्यात त्रिशतकी ‘बॅटींग’ झाली. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ धरणांमध्ये ९१ टक्के जलसाठा झाला आहे.

१८ धरणांमधून विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. (heavy rain in nashik ditrict Dindoori nashik Latest rain update news)

तालुकानिहाय आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात तालुक्यातील पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-११७ (१९२.३), बागलाण-१३ (२०२.३), कळवण-१२.१ (२६६), नांदगाव-६.८ (१५२.७), सुरगाणा-३८.४ (२१०.६), नाशिक-२०.३ (१६४.८), दिंडोरी-३८.३ (३३०.२), इगतपुरी-३३.५ (८०.९)

, पेठ-८५ (२४५.८), निफाड-१६.७ (२१०.८), सिन्नर-७.४ (१३१.४), येवला-१०.५ (१३३.३), चांदवड-१८.४ (२३४.६), त्र्यंबकेश्‍वर-२३ (१३४), देवळा-९ (२२८.४). गेल्यावर्षी ६३.६ टक्के पावसाची नोंद झाली होती आणि मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, देवळा तालुक्यातील पावसाचे प्रमाण १०० टक्क्यांच्यापुढे पोचले होते. शिवाय नांदूरमधमेश्‍वर धरणात १०० टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील धरणातील गेल्यावर्षी २९ टक्के जलसाठा होता.

Heavy Rain latest marathi news
इगतपुरीतील तिहेरी खुनप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

नांदूरमधमेश्‍वरमधून ३२ टीएमसी विसर्ग

यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्‍वर धरणातून आज सकाळपर्यंत ३१.९० टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. या धरणातून आज सायंकाळी ३२ हजार ४६२ क्यूसेस विसर्ग सुरु होता. त्याचप्रमाणे यंदा आज सकाळपर्यंत दारणातून ७.२३, गंगापूरमधून ४.२२, कडवामधून १.९० टीएमसी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

गिरणा धरण ९२ टक्के भरले आहे. गिरणामधून ७ हजार १२८ क्यूसेस विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातील जलसाठा ६५ टक्के ठेऊन १ हजार ३७७ क्यूसेस विसर्ग सुरू आहे. इतर धरणांमधून सुरू असलेला विसर्ग क्युसेसमध्ये असा : आळंदी-४४७, पालखेड-१० हजार ३३२, करंजवण-४ हजार ७३०, वाघाड-२ हजार २१८, ओझरखेड-१ हजार ४६१, पुणेगाव-८०५, तिसगाव-१३०, दारणा-६ हजार ७२८, भावली-७०१, वालदेवी-२४१, कडवा-६४७, भोजापूर-५४०, चणकापूर-२ हजार ६८, हरणबारी-८४६, केळझर-३८८. नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्‍वरमधून गोदावरीमध्ये सुरु असलेल्या विसर्गाचे पाणी मराठवाड्यातील जायकवाडीपर्यंत पोचते.

जायकवाडीमध्ये आज दुपारपर्यंत ७७.१७ टक्के जलसाठा झाला होता. जायकवाडीमधून ७९ टक्क्यांपर्यंत जलसाठा पोचताच, विसर्ग सुरु करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे.

मूग, मका अन सोयाबीनची पेरणी १०० टक्क्यांपुढे

जिल्ह्यात आतापर्यंत खरिपामध्ये ७५ टक्क्यांहून अधिक पेरण्या उरकल्या आहेत. भाताच्या लागवडीला वेग आला असल्याने यंदा खरिपाचे क्षेत्र शंभर टक्क्यांच्या आसपास पोचण्याची चिन्हे आहेत.

मक्याची लागवड १०६.०३, मुगाची पेरणी ११९.४८, सोयाबीनची पेरणी १३३.२३ टक्के झाली आहे. इतर पिकांखालील क्षेत्राची टक्केवारी अशी :

भात-१८.६१ ज्वारी-२२.११

बाजरी-५७.७५ नागली-६.७१

तूर-५५.३८ उडीद-२६.१९

भुईमूग-७३.८५ कापूस-८३.८७

Heavy Rain latest marathi news
आदिमायेच्या जयघोषात श्री सप्तशृंगीच्या मूर्ती संवर्धन कार्यास प्रारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com