esakal | VIDEO : इगतपुरी तालुक्यात विजेचा कडकडाट अन् गारांसह मुसळधार पाऊस

बोलून बातमी शोधा

Heavy Rain In Igatpuri
VIDEO : इगतपुरी तालुक्यात विजेचा कडकडाट अन् गारांसह मुसळधार पाऊस
sakal_logo
By
ज्ञानेश्वर गुळवे

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात तासभर मुसळधार गारांचा अवकाळी पाऊस पडला.

बळीराजाच्या पिकाचे नुकसान

परिसरात गारांचा खच साचून पावसामुळे शेती पूर्णतः जलमय झाली असून बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर काढणी सुरु असलेल्या तसेच शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकाचे,तसेच जनावरांचा चारा भिजल्याने खूप नुकसान झाले आहे. दिवसभर तप्त उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता दुपारनंतर सुमारे अडीच वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची खूपच तारांबळ उडाली होती.

हेही वाचा: 'डोंगरांची काळी मैना' बहरली! लवकरच होणार बाजारात दाखल