esakal | 'डोंगरांची काळी मैना' बहरली! लवकरच होणार बाजारात दाखल

बोलून बातमी शोधा

karvand
'डोंगरांची काळी मैना' बहरली! लवकरच होणार बाजारात दाखल
sakal_logo
By
संदिप मोगल

लखमापूर (जि. नाशिक) : डोंगरांची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली " करवंदे" दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगरद-यांत बहरली असून अजून दहा ते वीस दिवसात रानमेवाही तयार होऊ पाहात असल्याने आगामी काही दिवसात याचा आस्वाद घेता येणार आहे.

रानमेव्याची चवच न्यारी

वसंत आणि ग्रीष्मातील दाहकतेची पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट, आंबट, गोड, रसाळ, रानमेवा जिभेवर ठेवताच तासनतास त्या रानमेव्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळ्यात होतेच होते. विलायती चिंच, आवळा, बोरे, कैरी,आदीची चवही काही न्यारीच उन्हाळा सुरू झाला की जिभेचे चोचले पुरविणारा काही ठिकाणचा रानमेवा दुर्मिळ होत चालेला असतांना देखील दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या या करवंद रूपी रानमेवेला चांगला बहर आलेला आहे. चैत्र महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते .ते आंबट गोड चवीच्या करवंदाचे.डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. या झाडांला पांढ-या रंगाची फुले येतात.फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंद बहरतात.पुर्णपणे पिकल्यावर या फळांचा रंग काळा होतो.आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून करवंदे तोडण्यासाठी रानात पायपिट करतात.व आजूबाजूच्या खेड्यापाड्यात व शहरी भागात विक्री साठी नेतात.

हेही वाचा: राहत्या घरातून अचानक नवविवाहित बेपत्ता; काय घडले त्या रात्री?

खाल्ल्यानंतर मिळतो मनाला गारवा!

डोंगरांची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदांचा गोडवा वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशा गर्मीत मनाला गारवा देणारी करवंद खायची संधी मिळते. डोंगररांगेत मोठ्या प्रमाणात करवंदाच्या जाळ्या पाहायला मिळतात. थंडगार असलेली करवंद खायला मस्त असुन ती खाल्लानंतर मनाला गारवा मिळतो.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

सुदृढ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त

करवंद हे बेरी वर्गीय फळ असुन त्याचा आरोग्य राखण्यासाठी ही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिकारशक्ती चे काम करतात. करवंद हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही.मात्र कच्च्या करवंदाचे लोणचे,व पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर जास्त काळ टिकतो.करवंदांच्या झाडांना प्रंचड प्रमाणात काटे असतात. अशामध्ये कष्टपुर्वक काढलेल्या करवंदांना कमी भाव बाजारात मिळतो. शहरात व ग्रामीण भागात उन्हाळी रानमेवा व्यतिरिक्त करवंदाची चव काही औरच असते. परंतु आता आदिवासी भागात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने या रानमेवाच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.