
नाशिक : राज्यात अद्याप मॉन्सून दाखल झालेला नाही पण तत्पूर्वीच मॉन्सून पूर्व पावसानं राज्याला अक्षरशः झोडपून काढलं असून मोठं नुकसानही केलं आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातही शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळं कांद्याच्या उभ्या पिकाचा शेतातच चिखल झाला आहे. पण अद्याप इथं अधिकारी वर्ग फिरकलेलाही नाही, त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.