
नामपूरला पहिल्यांदाच दमदार पाऊस; उकाड्यापासून काहीसा दिलासा
नामपूर (जि. नाशिक) : नामपूरसह परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोसाट्याचा वारा (Storm) आणि विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या (Rains) सरी बरसण्यास सुरवात झाली. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. (Heavy rains for first time in Nampur Nashik News)
हेही वाचा: ताडपत्रीचे दर कडाडले; शेतकरी वर्ग वळला बॅनर खरेदीकडे
वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे बळीराजा सुखावला असून, बच्चे कंपनीने पावसात भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटला. नामपूरला दिवसभर उन्हाच्या असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी तीननंतर आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमू लागली. अचानक वातावरणात बदल झाल्याने सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. काही वेळातच विजेच्या कडकडाटासह पहिल्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाली. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तापमानात मोठी घट दिसून आल्याने समाधान व्यक्त केले जात होते.
हेही वाचा: Nashik : महापालिकेचा खासदार पुत्रास दणका; ठोठावला 4 लाखाचा दंड
Web Title: Heavy Rains For First Time In Nampur Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..