esakal | इगतपुरी तालुक्यातील धरणक्षेत्रात जोरदार जलधारा; पाणीसाठ्यात भरीव वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

igatpuri rain

इगतपुरी तालुक्यातील धरणक्षेत्रात जोरदार जलधारा

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : Nashik Rain Update गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने मर्जी दाखवीत व भात पिकासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या इगतपुरी तालुक्यात कालपासून जोरदार आगमन केले आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्यात तर धुव्वांधार पाऊस असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. दोन दिवसांच्या पावसाने तालुक्यातील भावली, भाम, दारणा धरणाच्या जलसाठ्यात भरीव वाढ झाल्याने तालुक्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर पसरली आहे.

तालुक्यात रविवारी (ता.१८) इगतपुरी, घोटी व भावली परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. सोमवारी (ता. १९) पाऊस कायम आहे. या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. पाऊस झाल्याने भात लागवडीच्या कामाला आता सर्वत्र वेग येणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात चांगलीच वाढ झाली. भावली धरण ६२ टक्के, दारणा धरण ४८ टक्के, भाम धरण १५ टक्के , मुकणे २४ टक्के, तर कडवा १३ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. तालुक्यात २४ तासात ७६ मिलिमीटर पाऊस झाला असून, इगतपुरी मंडळात २२२ मिलिमीटर तर भावली धरण परिसरात २४६ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात पहिल्याच पावसाने दारणा, भाम व भावली नद्या प्रवाहित झाल्या आहेत.

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

loading image