Nashik : कन्नड घाटातील अवजड वाहतूक आजपासून बंद! ...अन पर्यायी मार्गावर 5 तास चक्का जाम; पहा Video

Heavy traffic in Kannad Ghat has been stopped from today nashik news
Heavy traffic in Kannad Ghat has been stopped from today nashik newsesakal

नांदगाव : कन्नड घाटातील अवजड वाहतूक आजपासून बंद करण्यात आली.

औरंगाबादच्या उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना कन्नड घाटातील अवजड वाहतूक नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक फाट्यावरुन न्यायडोंगरी व्हाया चाळीसगावकडे वळवण्याचा पर्याय सूचविला. (Heavy traffic in Kannad Ghat has been stopped from today nashik news)

त्यानुसार ही वाहतुक वळविण्यात आली. तळवाडे कासारी या घाटात आज लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हा घाट अतिशय नादुरुस्त झाला आहे. मोठ्ठे खड्डे व खड्ड्यात फसणारी वाहने यामुळे पहिल्याच दिवशी येथे वाहतूक कोंडी झाली आहे.

अजूनही ही कोंडी सुटलेली नाही. कन्नडचे चित्र आता तळवाडे कासारी घाटात दिसू लागले आहे. हा घाट सार्वजनिक बांधकाम विभागातील असला तरी साडेतीन किमीचा घाट वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्याचे नूतनीकरण व अन्य दुरुस्त्यांना वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने गेल्या दहा वर्षापासून त्याची दूरावस्था जैसे थे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Heavy traffic in Kannad Ghat has been stopped from today nashik news
Traffic Police Rules : ...तर द्यावा लागणार नाही ट्रॅफिक पोलिसांना दंड; जाणून घ्या तुमचे 10 अधिकार!

त्यातच औरंगाबादकडील कन्नडची अवजड वाहतूक या मार्गाने वळविण्यात आल्याने या भागातील शेतकरी व अन्य ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे.

कन्नड घाटातून जाणारे सर्व अवजड वाहने हे शिऊर बंगला ते तळवाडे कासारी या मार्गाने न्यायडोगरीमार्गे वळविण्यात आली आहे. मुळातच तळवाडे ते कासारी पावेतोचा घाट हा अरुंद व मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे.

या रस्त्यावरील घाटात आज पहिल्या दिवशीच एक अवजड कंटेनर नागमोडी वळणावर चढावाच्या ठिकाणी अडकल्याने जवळपास पाच तास रहदारी बंद पडली. त्यामुळे औरंगाबाद व नांदगाव दरम्यान दोन्ही बाजूला चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Heavy traffic in Kannad Ghat has been stopped from today nashik news
Nashik News : सोन्याची घनता मोजणारे ‘कीट’ विकसित; नाशिकमधील उमेश नागरेंनी बनविले उपकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com