Nashik News : सोन्याची घनता मोजणारे ‘कीट’ विकसित; नाशिकमधील उमेश नागरेंनी बनविले उपकरण

Umesh Nagre created Density Test Kit which measures density of gold nashik news
Umesh Nagre created Density Test Kit which measures density of gold nashik newsesakal

Nashik News : बँकेकडून सोन्याचे मूल्यांकन करताना सुवर्णकारांना बनावट दागिने ओळखणे अनेकदा कठीण जाते. शिवाय, त्यात फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारीही सुवर्ण मूल्यांकनकारांवर येते.

त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘व्हॅल्यूएशन’ क्षेत्रात पारदर्शकता आणत गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे तरुण अभियंता उमेश नागरे यांनी सोन्याची घनता मोजणारे ‘डेन्सिटी टेस्ट कीट’ तयार केले.

परदेशात लाखो रुपयांत मिळणारे हे उपकरण श्री. नागरे यांनी साडेतीन हजारांत तयार केले आहे. (Umesh Nagre created Density Test Kit which measures density of gold nashik news)

या उपकरणात दागिना न कापता अथवा ॲसिड न टाकता तपासता येतो. स्टेनलेस स्टील- ४१० पासून हे उपकरण बनविले आहे. सोने मूल्यांकनकारांनी दिलेल्या मूल्यांकनानुसार बँक ग्राहकांना कर्ज देते.

वाढत्या भावासह बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, त्यावर उपाय म्हणून सोन्याची घनता मोजणारे यंत्र बाजारात एक ते अडीच-तीन लाख रुपयांपर्यंत मिळते. श्री. नागरे यांनी हे उपकरण नाशिकमध्ये बनविले. यंत्राबरोबर ‘अँड्रॉइड ॲप’ देण्यात आले आहे.

ॲपमध्ये तीन टप्प्यांत सविस्तर माहिती देण्यात आली. सोन्याचे वजन नेहमीसारखे एकदा उपकरणात केले जाते. दुसऱ्यांदा पाण्यात बुडवून वजन करून त्याची घनता मिळविता येते. घनतेच्या आधारे आपल्याला सोन्याची शुद्धता अथवा त्यात इतर धातू काही मिसळलेले असल्यास ते समजते.

सुवर्ण मूल्यांकन ही प्राचीन कला

सोन्याचे मूल्यांकन अतिशय महत्त्वाचे आहे. सुवर्ण मूल्यांकन कला ही प्राचीन असून, या कलेचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांत आढळतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Umesh Nagre created Density Test Kit which measures density of gold nashik news
Gold Jewelry Cleaning: तुमचे सोन्याचे दागिने फिके पडले आहेत? मग या उपायांनी पुन्हा चमकेल सोनं

ही कला दोन हजार ३०० वर्षांपासून अस्तित्वात आहे. प्राचीन काळापासून विविध परीक्षण पद्धती अस्तित्वात आहेत. त्यातील कसोटी, परीक्षण कलेचा उल्लेख हा पहिल्या शतकातील कालिदास लिखित ‘मेघदूत’मध्ये आहे.

"आधुनिक पद्धतीने बनवलेले बनावट दागिने पारंपरिक पद्धतीने ओळखणे हे अवघड जात असल्याने तंत्रज्ञानाचा वापर करीत गोल्ड ‘व्हॅल्यूअर’ असोसिएशनने ‘व्हॅल्यूएशन’ क्षेत्रात पारदर्शकता आणली आहे. संस्थेचे दीड हजाराहून अधिक सभासद आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन माहिती दिली जाते."- राजेंद्र दिंडोरकर, कार्याध्यक्ष, गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन

"गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनने विकसित केलेले ‘डेन्सिटी टेस्ट कीट’ हे स्वदेशी बनावटीचे आहे. ते ‘मेक इन इंडियां’तर्गत बनविले. हे कीट परदेशी कीटच्या तुलनेत स्वस्त आहे. ते साडेतीन हजार रुपयांत सभासदांना उपलब्ध करून देण्यात आले." - चेतन राजापूरकर, उपाध्यक्ष, गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन

"बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्यात भविष्यात काही अडचण जाणवल्यास त्या सोन्याच्या नुकसान भरपाईची जबाबदारी ही ‘गोल्ड व्हॅल्यूअर’ची असते. सोने परीक्षण करणाऱ्यांना नुकसान होते. दागिन्यांच्या फसवणुकीची समस्या दूर करण्यासाठी उपकरणाची निर्मिती केली." - उमेश नागरे, अभियंता

Umesh Nagre created Density Test Kit which measures density of gold nashik news
Ganeshotsav 2023 : पर्यावरणपूरक गोमय गणपतीबाप्पा! गायीच्या शेणाने दिला प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com