esakal | कोरानाने मृत पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मिळवून देणार मदत! 'या' अभियानामार्फत आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus 2.jpg

कोविड विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे जग सोडून गेले त्या विद्यार्थ्यांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात देणे ही समाजातील सर्वच जणांची सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जाणून घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

कोरानाने मृत पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मिळवून देणार मदत! 'या' अभियानामार्फत आवाहन

sakal_logo
By
भाऊसाहेब गोसावी

नाशिक / चांदवड : कोविड विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे जग सोडून गेले त्या विद्यार्थ्यांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात देणे ही समाजातील सर्वच जणांची सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जाणून घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

कोरानाने मृत पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मिळवून देणार मदत 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशकडून पूर्ण राज्यभर कोविड विद्यार्थी-पालक अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोना विषाणूला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला, अशा पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी, असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
कोविड विषाणूमुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे जग सोडून गेले त्या विद्यार्थ्यांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात देणे ही समाजातील सर्वच जणांची सामाजिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी जाणून घेत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अनेक विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्यातील दुवा होण्याचे काम येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य करतील, अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांनी मांडली आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचत त्यांना मदत करणार
येणाऱ्या काळात नाशिक जिल्हा, तसेच चांदवड तालुक्यातील विद्यार्थी आणि दानशूर व्यक्ती यांनी संपर्क करण्याचे आवाहन भास्करे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनाच्या साथीत दुर्दैवी मृत्यू झाला अशा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचत त्यांना मदत करणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चांदवड तालुकाध्यक्ष बापू गागरे, रोशन देवढे, राहुल एळिंजे, विशाल सोनवणे, भूषण गांगुर्डे यांनी सांगितले. विद्यार्थी व पालकांनी अधिक माहितीसाठी नंदन भास्करे (मो. 8805543333), आकाश कदम (9595619198), भावनेश राऊत (9545955632) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

loading image
go to top