esakal | Positive Story : आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी तासाभरातच जमले पावणेपाच लाख

बोलून बातमी शोधा

covid center
Positive Story : आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी तासाभरातच जमले पावणेपाच लाख
sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : कोरोना या महामारीने संपूर्ण जगावर थैमान मांडले आहे. गल्ली ते दिल्ली सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. पण नि:स्वार्थीपणे चांगले कार्य करायचे ठरले, तर शेकडो हात मदतीसाठी पुढे येतात. याचा प्रत्यय शुक्रवारी (ता.२३) सातपूर भागात आला. काय घडले नेमके?

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय

रेशीमगाठी मंगल कार्यालयात ७० बेड

सातपूरला महापालिकेचे एकही कोविड सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर नाही. शासनाची वाट बघत बसण्यापेक्षा सातपूरकर म्हणून आपणच एकत्र यावे, या एका विचाराने सातपूरकर एकवटले. यात सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर व तरुण मित्रांचा समावेश आहे. सर्वांनी मिळून बैठक घेतली आणि अवघ्या तासाभरात पावणेपाच लाखांहून अधिक निधी जमा झाला. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी रेशीमगाठी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली व सहकार्याची भावना दर्शवली. या वेळी सर्वांनी कोरोना महामारीशी दोन हात खेळण्यासाठी पुढाकार दर्शविला. ‘आम्ही सातपूरकर’ या समूहातर्फे सातपूरला रेशीमगाठी मंगल कार्यालयात ७० बेड उपलब्ध झाले आहे. लवकरच ते सातपूरकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

सुरवातीला आयसोलेशन सेंटर करण्याचा निर्णय

कोविड रुग्णांना मोफत चहा, नाश्ता

दोन वेळेचे पौष्टिक जेवण

रुग्णांसाठी योगा, रुग्णांना करमणूक म्हणून खेळायची सुविधा