Hemant Godse : आयटी पार्क, इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी जागांचे आरक्षण लवकरच : खासदार हेमंत गोडसे

hemant godse statement Reservation of seats for IT Park  Electrical Cluster soon nashik news
hemant godse statement Reservation of seats for IT Park Electrical Cluster soon nashik newsesakal

Hemant Godse : जिल्ह्यात आयटी पार्क प्रकल्पासाठी शंभर एकर तसेच इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी दिंडोरी तालुक्यातील आक्रळे येथे दोनशे एकर जागेचे आरक्षण लवकरच होईल, अशी घोषणा खासदार हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी (ता. ६) येथे केली.

शिलापूर येथे शंभर एकर जागेत साकारलेल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचे उद्‍घाटन नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल, असेही खासदार गोडसे म्हणाले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चरतर्फे होत असलेल्या ‘मायटेक्स्पो- २०२३’ या प्रदर्शनाचे उद्‍घाटन खासदार गोडसे यांच्या हस्ते झाले. (hemant godse statement Reservation of seats for IT Park Electrical Cluster soon nashik news)

आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा, करुणाकर शेट्टी, नितीन बंग, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त विलास शिरोरे, खुशालभाई पोद्दार, शाखा अध्यक्ष संजय सोनवणे, समन्वयक सचिन शहा, सहसमन्वयक मिलिंद राजपूत, प्रायोजक दीपक चंदे, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत उपस्थित होते. त्या वेळी गोडसे बोलत होते.

‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, ‘आयमा’चे अध्यक्ष निखिल पांचाळ, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारिणी सदस्य संदीप भंडारी, ललित नहार, रवी जैन, नीलेश चव्हाण, प्रकाश कलंत्री, नीलिमा पाटील, दीपाली चांडक, मिथिला कापडणीस, भरत येवला, राजेंद्र कोठावदे, भावेश मानेक, राजेश मालपुरे, अंजू सिंघल, सचिन जाधव, सुनीता फाल्गुने, स्वप्नील जैन, संदीप सोमवंशी आदींसह कार्यकारिणी सदस्य, व्यापारी, उद्योजक, नागरिक उपस्थित होते

चेंबर ऑफ कॉमर्सने उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देते ही भूषणावह बाब आहे. प्रदर्शनामुळे नवउद्योजकांसाठी निश्चितच महत्त्वाचे दालन खुले होणार आहे असे प्रदर्शन महाराष्ट्रभर भरवावे, अशी अपेक्षा आमदार हिरे यांनी व्यक्त केली.

hemant godse statement Reservation of seats for IT Park  Electrical Cluster soon nashik news
ZP Bharti: जिल्हा परिषद भरतीअंतर्गत आज, उद्या परीक्षा; गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी व उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर नेहमीच पुढाकार घेते. नाशिकमध्ये लवकरच आयटी हब साकारणार असून, त्यामुळे रोजगारासाठी तरुणांना अन्यत्र जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे चेंबरचे अध्यक्ष गांधी यांनी नमूद केले.

चेंबरचे उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा यांनी प्रास्ताविक केले. चेंबरचे मुंबईनंतरचे हे दुसरे प्रदर्शन आहे. चार दिवसांच्या या प्रदर्शनात अनेक देशांचे कॉन्सुलेट जनरल भेटी देणार आहेत. प्रदर्शन बघण्यास येणाऱ्यांसाठी बक्षिसांची लयलूट असून, चार दिवसांत अकरा लाखांची पारितोषिके दर तासाला लकी ड्रॉद्वारे वितरित केली जाणार असल्याचे चोपडा यांनी या वेळी नमूद केले. वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी आभार मानले.

hemant godse statement Reservation of seats for IT Park  Electrical Cluster soon nashik news
Nashik News : सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा वेग मंदावला; भूसंपादनावरचं अडले घोडे, प्रकल्प किमतीत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com