
नाशिक : चैत्रोत्सवात कुंकवाला बाजारात मोठी मागणी
पिंपळगाव (जि. नाशिक) : सौभाग्याचे लेणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंकवाला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. स्त्रीदैवत म्हटले की कुंकवाचे महत्व ओघाने आलेच. हळदीपासून बनविलेल्या व शुद्ध प्रतीचे कुंकवाला जास्त महत्व आहे. चैत्र व नवरात्र या दोन्हीही उत्सव काळात मोठे सौभाग्याचं लेणं असलेल्या कुंकुला मानाचे स्थान असते. देवीच्या उत्सवकाळात कुंकूला बाजारात मोठी मागणी असते. अधिक रंगणाऱ्या कुंकूला सध्या मोठी मागणी असली तरी अनेक महिला आता त्यातील शास्त्रसुद्धा जाणून घेऊन हळदीपासून तयार झालेल्या कुंकूला पसंती देतात.
सप्तशृंगगडावरील बाजारपेठेत सध्या दोन प्रकारचे कुंकू उपलब्ध असून, त्यातील साधा कुंकू दराने कमी असल्याने त्याची मागणी अधिक आहे. भारतीय संस्कृतीत मोठे महत्व आहे. देवस्थानच्या ठिकाणी हळद आणि कुंकूची मोठी उलाढाल होत असते. विशेषतः देवी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कुंकूसह अन्य पूजेच्या साहित्याला मोठी मागणी असते. सध्या बाजारपेठेत कुंकूचे दोन प्रकार आहेत. यामध्ये साधा कुंकू, हळदीचे कुंकू हे दोन प्रकार विक्रीसाठी आहेत. साधा कुंकू हा दिसायला अधिक लाल भडक असतो. त्यामुळेच लोकांकडून आणि भाविकांकडून या कुंकूला मागणी असते. मात्र, दैनंदिन वापरासाठी हा कुंकू अनेकवेळा अनेक त्यांना हानीकारक ठरतो. त्यामुळे विक्रेते अनेकवेळा भाविक आणि महिलांना साध्या कुंकूऐवजी हळदीचे कुंकू घेण्याची शिफारस करतात. साधे कुंकु केमिकलयुक्त असते. हळदीच्या कुंकूचे दर साध्या कुंकूच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे काही भाविक हे कुंकू घेण्याचे टाळतात. मुळात औषध म्हणून हळदीचा उपयोग होत असल्यामुळे हळदीपासून बनवलेले कुंकू सर्वात उपयुक्त आहे.
हेही वाचा: नाशिक : काळाराम मंदिरात श्रीरामजन्मोत्सवाचा उत्साह; पाहा Photos
साधे कुंकू : ८५ रुपये प्रती किलो
हळदीचे कुंकू : १०० रुपये प्रती किलो
''हळदीचे कुंकू अर्चन करण्यासाठी वापरतात. हळदीचे कुंकू हा सौभाग्याचा शुद्ध अलंकार म्हणून मानला जातो. श्री चक्र किंवा श्री विद्या प्रकारातील कुंकवाला अनन्य साधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे कुंकू लावण्याची जी जागा आहे ती माणसाच्या शरीरातील चक्रांपैकी आज्ञा चक्रावरती आहे. आज्ञा चक्राचे स्थान हे दोन भुवयांमध्ये आहे. या ठिकाणी कुंकू लावून मनुष्य आपल्या शरीराला सुचारु ठेऊ शकतो. कुंकू हे सुवासिनी अलंकार तर पुरुष कपाळी टिळा म्हणून लावतात.'' - प्रमोद दीक्षित, पुरोहित
हेही वाचा: सीतेचा इहलोक त्याग....
Web Title: High Demand For Kunku In The Market During Chaitrotsav Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..