esakal | नाशिक : महिलेचा विनयभंग करणाऱ्या हायप्रोफाईल भोंदूबाबाला पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

fraud baba in nashik was remanded in police custody till Saturday

महिलेचा विनयभंग करणाऱ्या हायप्रोफाईल भोंदूबाबाला पोलिस कोठडी

sakal_logo
By
विनोद बेदरकर


नाशिक : पूजापाठसाठी ५० हजाराची मागणी करीत महिलेशी अंगलट करणाऱ्या हायप्रोफाईल भोंदूबाबाला जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवार (ता.११) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मूलबाळ होण्यासाठी पैशांची मागणी केल्याने अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सदर बाबाचा भांडाफोड करण्यात आला होता.

गणेश बाबूराव जोशी ऊर्फ महाराज (४७), असे बाबाचे नाव आहे. गंगापूर रोडवरील जेहान सर्कल परिसरातील सुमंगल सोसायटीत कार्यालय थाटून संशयिताने असाह्य नागरीकांना फसविण्याचा धंदा सुरू केला होता. आम आदमी पार्टी आणि अंनिस ला याबाबत माहिती मिळाल्याने महिलेस बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आले होते. मूलबाळ नसल्याचा बहाणा करून बाबाच्या दरबारात पोचलेल्या महिलेला उपाय म्हणून पूजापाठ करण्यास सांगितले. त्यासाठी ५० हजारांची मागणी केली. तसेच त्याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने गंगापूर पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केल्याने संशयितास अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, अधिक तपास उपनिरीक्षक संजय भिसे करीत आहेत.

हेही वाचा: नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारली

loading image
go to top