Hindu Janakrosh Morcha: हिंदू मुलींनो जाग्या व्हा, राक्षसाला ओळखा! येवल्यात लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा

Hindu Janakrosh Morcha: हिंदू मुलींनो जाग्या व्हा, राक्षसाला ओळखा! येवल्यात लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा

Hindu Janakrosh Morcha: ‘लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे’, ‘प्यार नहीं ये धोका हैं, सुधर जाओ दीदी’, ‘अभी भी मौका है, हिंदू बेटीया हिंदू बनो’, ‘लव्ह जिहाद को पहचानो’, ‘जिहाद्यांना फाशी झालीच पाहिजे’, ‘हिंदू मुलींनो जागे व्हा, त्याच्यातील राक्षस ओळखा’, ‘विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी’ आदी फलक हाती घेऊन हजारोच्या संख्येने जमलेल्या हिंदुत्ववादी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत शहरातून तहसील कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला.

त्यानंतर झालेल्या सभेत लव्ह जिहाद्यांना फाशी झालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी करण्यात आली. (Hindu Jan Akrosh Morcha against Love Jihad in Yeola nashik news)

लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवून लैंगिक अत्याचाराची घटना शहरातील तरुणींबाबत घडल्यानंतर सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी (ता. ४) शहर बंद पाळून तहसील कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. येथील एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून, आरोपींवरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

विशेष म्हणजे मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे नागरिक, महिला आणि तरुण-तरुणींचाही समावेश होता. येथील विंचूर चौफुलीवरील अटलबिहारी वाजपेयी चौकातून मोर्चाला सुरवात होऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा पुढे गेला. तरुण-तरुणींनी हातात विविध घोषणांचे फलक घेतले होते. हजारोच्या संख्येने निघालेल्या या मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मुलींच्या हस्ते दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार पंकज मगर यांना देण्यात आले.

शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. संभाजीनगर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षदा ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,‘ आपला धर्म सोडून कुठल्या जिहादींच्या नादी लागाल तर सात तुकड्यांमध्ये वाटले जाल. चार दिवस जगा, पण हिंदू म्हणून जगा. आमच्या हिंदू धर्मात कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही. लव्ह जिहादला बळी पडू नका, असे त्यांनी सांगितले.

Hindu Janakrosh Morcha: हिंदू मुलींनो जाग्या व्हा, राक्षसाला ओळखा! येवल्यात लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा
Nashik Election News: प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक की बिनविरोध? अर्ज दाखल करण्यास केवळ दोनच दिवस

छेडछाडीला प्रतिकार करा

नाशिक येथील सनातन संस्थेच्या राजश्री देशपांडे यांनी हिंदू धर्मातील माता भगिनींकडे कुणी वाकड्या नजरेने बघता कामा नये, अशी दहशत ठेवा, लव्ह जिहादच्या माध्यमातून संपूर्ण जगावर राज्य करण्याचे षडयंत्र सुरू असून, त्या जाळ्यात अडकू नका. लव्ह जिहाद नावाचे संकट आज आपल्या देशासमोर उभं ठाकले आहे. त्यामुळे मुलींनो जागृत राहा. ज्या ज्या वेळेस धर्मांध तुमची छेड काढतील, त्याचा विविध माध्यमांतून प्रतिकार करा. मिळेल त्या शस्त्राने त्यांचा प्रतिकार करा. स्वतःचे संरक्षण करणे हा कायद्याने आपल्याला दिलेला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

...अन्यथा तुमचे भवितव्य अंधकारमय

संग्राम महाराज भंडारे (पुणे) यांनी आज प्रतिकार केला नाही, तर तुमचे भविष्य अवघड असल्याचे सांगत हिंदू मुलींवर अत्याचार होत असताना विरोध केला जात असेल, तर धार्मिक वळण देऊ नका, असे कोणी म्हणत असेल तर हिंदू समाज हे सहन करणार नाही. आम्ही हिंदू आहे हे अभिमानाने सांगा. त्यामुळे खंबीर होऊन लव्ह जिहादी प्रवृत्तींचा प्रखरपणे विरोध करताना नायनाट करा, लव्ह जिहादींच्या जाळ्यात कधीच फसू नका, असे आवाहन केले.

शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष अद्वैतराव देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा मार्ग विसरू नका, आपल्या धर्माचा अभिमान बाळगून इतरांच्या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन केले. सोनाली परदेशी, रोकडे हनुमान मंदिराचे संदीपगिरी महाराज, श्रावण महाराज विसपूरकर यांनी भूमिका मांडून हिंदू मुलींनी काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्वच येवला शहर पोलिस ठाण्याची इमारत इतरत्र हलविल्यास पुन्हा हिंदूंचा मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला दिला. ॲड. प्रसाद भावसार व रोहित साबळे यांनी सूत्रसंचालन केले.

स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद!

येवला शहरात अशा पद्धतीने निघालेला शहरातला हा पहिलाच मोर्चा होता. विशेष म्हणजे शहर तालुक्यातील हजारो तरुण-तरुणी या मोर्चात सहभागी झाले होते. शहरवासीयांनी व व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुपारी दोनपर्यंत कडेकोट बंद पाळला. यामुळे संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट होता. दुकाने बंद ठेवून अनेक जण मोर्चात सहभागी झालेले होते. मोर्चा संपल्यानंतर सर्वानुमते दोननंतर दुकाने सुरू करण्यात आली. दरम्यान,पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला होता.

Hindu Janakrosh Morcha: हिंदू मुलींनो जाग्या व्हा, राक्षसाला ओळखा! येवल्यात लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा
Nashik ZP News: जि.प.चे विभागप्रमुख फिल्डवर; प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी तालुक्यांना भेटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com