esakal | 'तो' विवाह सोहळा अखेर रद्द! बच्चू कडूंचे लग्नात नाचण्याचे स्वप्न अधुरेच
sakal

बोलून बातमी शोधा

hindu muslim wedding

राज्याचे लक्ष लागलेला 'तो' विवाह सोहळा अखेर रद्द!

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : आठवडाभरापासून नाशिक शहरात होणारा तो हिंदू व मुस्लिम धर्मातील विवाह सोहळा चांगलाच चर्चेत राहिला. सुरवातीला सोशल मीडियावर आलेली 'ती' लग्नपत्रिका बघून अनेकांनी या विवाह सोहळ्याला विरोध दर्शविला होता. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित परिवाराची भेट घेत हा विवाह सोहळा कसा होत नाही ते बघतो. एवढेच नव्हे तर या विवाह सोहळ्याला हजेरी लावून नाचतो देखील असे आव्हानात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. अखेर या वादावर आता पडदा पडला असून मंत्री बच्चू कडू यांचे नाचण्याचे स्वप्न राहिले अधुरेच राहिले आहे. (hindu-muslim-wedding-ceremony-finally-canceled-marathi-news-jpd93)

मंत्री बच्चू कडू यांचे नाचण्याचे स्वप्न राहिले अधुरे

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेला व नाशिक शहरात होणारा नियोजित हिंदू- मुस्लिम धर्मातील विवाह सोहळा चांगलाच चर्चेत राहिला. सुरवातीला सोशल मीडियावर आलेली ती लग्नपत्रिका बघून अनेकांनी या विवाह सोहळ्याला विरोध दर्शविला होता. त्यानुसार समाजातील काही संघटनांनी संबंधित मुलीच्या हिंदू परिवारातील पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पालकांनी देखील हा विवाह सोहळा रद्द करण्यात येत आहे अशा प्रकारचे पत्र दिले होते. त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित परिवाराची भेट घेत हा विवाह सोहळा कसा होत नाही ते बघतो. एवढेच नव्हे तर या विवाह सोहळ्याला हजेरी लावून नाचतो देखील असे आव्हानात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते.

...अखेर सर्वांचाच जीव भांड्यात पडला

बच्चू कडू यांच्या विरोधात अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार ठरलेल्या तारखेला विवाह होतो का ? आणि झालाच तर त्याला विरोध तर होणार नाही ना ? अशा विविध प्रकारच्या शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. आज (ता.१८) चांडक सर्कलवरील एका हॉटेलात ठरलेला हा विवाह सोहळा अखेर रद्द झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. यासंदर्भात मुलीच्या पालकांशी बोलणे केले असता त्यांनी समाजाला दिलेले पत्र व शब्द पाळला असून त्यामुळेच हा विवाह सोहळा रद्द करण्यात आल्याचे सकाळला सांगितले. पालकांनी दाखवलेल्या सामंजस्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा: काका-आण्णा ड्रायव्हींग सिटवर! २०२४ च्या रेसची आतापासूच मोर्चेबांधणी

हेही वाचा: विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी

loading image